MahaTransco Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MahaTransco Bharti
रिक्त पदांची संख्या आणि तपशील
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत कार्यकारी अभियंता (Civil) 04, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18, उपकार्यकारी अभियंता (Civil) 07, सहाय्यक अभियंता (Civil) 134, सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01, वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01, व्यवस्थापक (F&A) 06, उपव्यवस्थापक (F&A) 25, उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37 या एकूण 493 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे B.E/BTech (Civil), CA / ICWA / B.Com / MS-CIT / MBA (Finance)/M.Com आणि अनुभव असणे आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा)
तसेच, उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 38 ते 57 वर्षे निश्चित करण्यात आली असून मागासवर्गीयांना 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
वेतनमान आणि नोकरी ठिकाण
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार मिळेल, त्यामुळे मुळ जाहिरात वाचा. तसेच, नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असू शकते.
अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे. या पदासाठीच्या लेखी परीक्षा ही मे/जून 2025 दरम्यान होईल.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
MahaTransco Bharti 2025
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | जाहिरात शुद्धीपत्रक |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मे 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांसाठी भरती; असा करा ऑनलाईन अर्ज
BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांसाठी भरती