Saturday, June 14, 2025
---Advertisement---
---Advertisement---

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी अंतर्गत 393 जागांसाठी भरती

AAICLAS Recruitment 2025 : AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी (AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited) अंतर्गत पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AAICLAS Bharti

---Advertisement---

रिक्त पदांची संख्या आणि तपशील

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी अंतर्गत सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) 227, असिस्टंट (सिक्योरिटी) 166 या पदांच्या एकुण 393 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण], 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांची वयोमर्यादा 27 वर्षे निश्चित करण्यात आली असून SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट तर OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट असणार आहे.

वेतनमान आणि नोकरी ठिकाण

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) – पहिल्या वर्षी 30,000, दुसऱ्या वर्षी 32,000, तिसऱ्या वर्षी 34,000 तर असिस्टंट (सिक्योरिटी) – पहिल्या वर्षी 21,500, दुसऱ्या वर्षी 22,000, तिसऱ्या वर्षी 22,500 पर्यंत पगार मिळेल. तसेच, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा. अर्ज करणाऱ्या Gen / OBC उमेदवारांसाठी 750 रूपये तर SC / ST / EWS / महिला उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 असल्याने उमेदवारांना शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे. तसेच परीक्षेची तारिख नंतर कळविण्यात येईल.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

AAICLAS Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीसिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)
जाहिरात पाहण्यासाठीअसिस्टंट (सिक्योरिटी)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles