Thursday, April 25, 2024
HomeNewsदेश विदेशातील आजच्या महत्त्वाच्या टॉप फाइव्ह घडामोडी वाचा एका क्लिक वर

देश विदेशातील आजच्या महत्त्वाच्या टॉप फाइव्ह घडामोडी वाचा एका क्लिक वर

 

१)भारत आणि चीन देपसंग वरती मेजर जनरल पातळीवरती चर्चा करण्याच्या तयारीत


दिल्ली, भारत: १५ जून २०२० च्या भांडणानंतर प्रथमच भारत आणि चीनमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा होणार आहे. भांडणानंतर जूनपासून चीनने मोठ्याप्रमाणात सीमेवरती काम हाती घेतलेले असून रणगाडे, सैन्य आणि इतर युद्ध सामुग्री सीमेवरती तैनात केले आहे.

२)सोमालियाच्या सैन्यदलाच्या ठाण्याजवळ मोठा स्फोट, कमीत कमी ८ मृत्यूमुखी तर १४ जखमी


नैरोबी, सोमालिया: अल कायद्या बरोबर संबंध असलेल्या अल शबाबने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. एका कारमध्ये बॉम्ब ठेऊन गेटजवळ हा स्फोट घडवण्यात आला, असे समोर आले आहे.

३)तुर्कस्तान बैरूतचे जहाजतळ बांधायला लेबनॉनला मदत करणार


बैरूत, लेबनॉन: तुर्कस्तानचे उपराष्ट्राध्यक्षांना मेर्सिन बंदरात बांधकाम साहित्याची चढ उचल करण्याची संमती देत तुर्कस्तान बांधकाम करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच ॲम्बूलन्स विमान पण त्यांनी मदतीसाठी पाठवलेले आहे.

४)युरोपिय संघाने गुगलच्या फिटबीटबरोबर झालेल्या $२.१ बिलियनच्या व्यवहारावर चौकशी बसवली


लंडन, ब्रिटन: गुगलने फिटबीट बरोबर केलेला $२.१ बिलियनच्या व्यवहारात गुगलने फिटबीटची माहिती इतर त्याच्या कंपन्यांबरोबर वापणार नाही असा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा खरा आहे का नाही यावर व्यवस्थापकांना शंका असल्यामुळे चौकशी होणार आहे.

५)बैरूतमध्ये केलेल्या अमोनियम नाट्रेटच्या साठ्यामुळे स्फोट होण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी खूप आधिच सरकारपुढे मांडली होती


बैरूत, लेबनॉन: कमीत कमी १० वेळा गेल्या ६ वर्षात लेबनॉनचे कस्टम विभाग, सैन्यदल, बंदर संरक्षण विभाग आणि न्यायव्यवस्थेकडून याबाबत सरकारला कळविणात आलेले होते. तरीही बंदर व्यवस्थापकांकडून कोणतेही बचावाची तयारी करण्यात आलेली नव्हती ही माहिती आता समोर आलेली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय