१. चीनने हॉगकॉगमधील एका हॉटेलमध्ये चीनचे सुरक्षा कार्यालय सुरु केले.
हॉगकॉग,चीन : चीनने हॉगकॉगमध्ये देशाच्या सुरक्षा विभागाचे कार्यालय सुरु केले. हे कार्यालय हॉगकॉगमध्ये सुरक्षाविभागाचा कारभार पाहणार आहे.
२. इथिओपियामध्ये गायकाच्या मृत्युनंतर होत असलेल्या आंदोलनामध्ये २३९ लोकांचा मृत्यु.
अद्दिस अबाबा, इथिओपिया : प्रसिध्द गायक हचालू हुदेस्साच्या खूनानंतर उसळलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात ९ पोलिस कर्मचारी, ५ सैनिक आणि २१५ लोक मृत्यू पावले.
३. जशाच तशे वागण्याच्या प्रकियेचा अवलंबून करून चीनने अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विसावरती बंधने लादली.
बीजिंग, चीन : तिबेटच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकने एकमेकांच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विसा वरती बंधने लादली आहेत. त्यामध्ये जे कोणी वाईट वागतील त्यांवर ही बंधने लादण्यात आली आहेत.
४. अमेरिकेने उत्तर कोरियाबरोबरच्या द्विपक्षिय चर्चेवरती पाणी टाकले.
सेऊल, दक्षिण कोरिया : अमेरिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या सेऊलला दिलेल्या भेटीमूळे उत्तर कोरियाबरोबर चाललेल्या चर्चाला स्थगिती आली. हे अधिकारी दक्षिण कोरिया आणि जपानला भेट देणार असून ते आण्विक शस्त्र आणि शस्त्रास्रांवरती चर्चा करणार आहेत.
५. आफ्रिकेत कोरोना बाधितांच्या संख्येबाबत कोणती माहिती उपलब्ध नाही : WHO
नैरोबी : आफ्रिकेतील कोरोनाबाधितांच्या संख्येची पडताळलेली माहिती उपलब्ध नसल्यामूळे तेथिल बाधितांची संख्या किती? आणि मृत्युचे प्रमाण किती ? याबाबत माहिती उपलब्ध नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.
६. डोनल्ड ट्रम्पचे कट्टर समर्थ केनये वेस्ट ट्रम्पविरोधात राष्ट्राध्यक्षच्या निवडणुक लढवणार : केनये वेस्ट.
अमेरिका : अमेरिकेचे डॉनल्ड केनये ट्रम्पचे कट्टर समर्थक केनये वेस्ट ट्रम्पविरोधात राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी ‘द बर्थेडे पार्टी’ सुरु केली.
७. भुतानने चीनबरोबर असलेल्या सिमेची द्विपक्षिय चर्चा करणार : भुतान सरकार
भुतान : भुतानच्या सीमेवरती चीनने हक्क सांगितल्यानंतर भुतानने चीनबरोबर द्विपक्षिय चर्चा करणार असल्याचे सांगितले.
८. ब्रिटनचे अर्थमंत्री रिषी सुनक यांनी नवीन २९००० कोटीचे उद्योगधंद्यांसाठी आर्थिक सहाय्य घोषित केले.
लंडन, ब्रिटन : ब्रिटनने पुन्हा एकदा उद्योगांना भरारी यावी म्हणून २९००० कोटीचे आर्थिक सहाय्याची घोषणा केली. त्यामध्ये हॉटेलमधील जेवण ५०% सुटीने मिळावे म्हणून पण व्यवस्था आहे.
९. मायक्रोसॉफ्ट कंपनीने Xbox वरती खेळल्या जाणाऱ्या खेळाच्या नवीन आवृत्तीसाठी पैसे घेऊ नये असे सांगितले.
अमेरिका : जगातिक संगणकीय क्षेत्रात मोठे नाव असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या Xbox मध्ये जर कोणी एका प्रकारातून दुसऱ्या पिढीच्या संयंत्रात जात असेल त्यांना जुन्या संगणकिय खेळाच्या नवीन आवर्तुसाठी कोणतेही शुल्क लावू नये असे तिच्या सहाय्यक कंपन्यांना सांगितले.
१०. ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादित वस्तू कोणत्या देशाची आहे, त्यावर काम चालू केले.
दिल्ली, भारत : भारत सरकारने लावलेल्या सरकारी खरेदीवर उत्पादन कोणत्या देशात तयार झाले याबाबतच्या नियमानंतर ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्यानी आपल्या विक्री होणाऱ्या उत्पादन कोणत्या देशातून येत आहे याचा उल्लेख व्हावा म्हणून प्रक्रिया सुरु केली.