Friday, April 19, 2024
Homeग्रामीणनागापूर येथील पोलिसभरती पूर्व प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरु करा; अन्यथा तीव्र आंदोलन...

नागापूर येथील पोलिसभरती पूर्व प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरु करा; अन्यथा तीव्र आंदोलन करू – एसएफआय

जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं कारस्थान – दिपक वाळकोळी

घोडेगाव : आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालविले जाणारे नागापूर (ता.आंबेगाव) येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अनेक वर्षांपासून बंद आहे. हे पुन्हा सुरु करावे या मागणीसाठी आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आंबेगाव तालुका समितीच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगावचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना एसएफआयचे आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी म्हणाले, “संघटनेने यापूर्वी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी दोन – तीन वेळा प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदने, चर्चा व आंदोलन केले आहे, परंतु वारंवार पाठपुरावा व आंदोलन करून देखील कार्यालयाकडून कोणतीच दखल घेतली नाही. हे एक प्रकारचे जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच कारस्थान आहे. येत्या १५ दिवसांत नागापूर(ता.आंबेगाव) येथील पोलिसभरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही वाळकोळी यांनी दिला आहे.

राज्यात पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असल्याने राजूर प्रकल्पांतर्गत असलेले अकोले (जि. अहमदनगर) येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू असताना घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत असलेले नागापूर येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची काही कोटींचा निधी खर्च करून बांधलेली इमारत धूळखात पडून आहे. आदिवासी विद्यार्थी हा आर्थिक दृष्टीने कमकुवत असल्याने तो हजारो लाखो रुपयांची फी भरून ऍकॅडमी मध्ये शिक्षण घेऊ शकत नाही, त्यामुळे आदिवासी विकास विभाकडून ही प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र, आज हे बंद आहे, व आदिवासी विकास विभाग ते सुरु करण्यासाठी सकारात्मक दिसत नाही, वारंवार पाठपुरावा व आंदोलन करून देखील दखल घेतली जात नाही. हे एक प्रकारे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान आहे. त्यामुळे लवकरात लवकरात नागापूर (ता.आंबेगाव) येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे, अन्यथा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आंबेगाव तालुका समिती पुढील दिवसांत तीव्र आंदोलन करेल असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. या संबंधीचे निवेदन प्रकल्पाचे कार्यालयीन अध्यक्ष योगेश खंदारे यांना देण्यात आले.

यावेळी एसएफआय आंबेगाव तालुका समितीचे अध्यक्ष दिपक वाळकोळी, उपाध्यक्ष रोषण पेकारी, सहसचिव हरिदास घोडे, मयूर हिले, तुषार बांबळे, दर्शन ढेंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Lic
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय