रत्नागिरी : मांडवीनाका ते मांडवी बीच या रस्त्यावर नगर परिषदेने नवीन गटार बांधलं. पण नवीन गटार बांधण्यापूर्वी जूनं असलेले गटार तेथील रहिवाशांच्या आणि वाहनधारकांच्या किती फायद्याचं होतं, याचा विचार नगरपालिका अभियंता,प्रशासक आणि ठेकेदार यांनी केलेला नसून त्याचे परिणाम मांडवी रहिवाशांना भोगावे लागत आहेत. जुन्या गटाराची उंची आणि रस्ता यांची समान लेवल असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी रुंद होता.
परंतु नवीन गटाराची उंची वाढवल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतूक कोंडी या मार्गात होतं असते. या मार्गावरून आपलं वाहन कधी मार्गस्थ होईल,याची शाश्वती या वाहन धारकांना नसल्याने, नाइलाजाने दूचाकीधारक आपलं वाहन रस्त्यातच पार्क करून मार्गस्थ होतात. नगरपालिका अभियंता, प्रशासक यांच्या ओम नाम्या सांग काम्या या घातकी वृत्ती मूळे वाहतूक कोंडीत वादावादी निर्माण होत असल्याची चर्चा मांडवी गावामध्ये जोरदारपणे चालू आहे.
तर गाड्यांच्या कर्कश हॉर्नमुळे लगत राहणाऱ्या रहिवाशांच्या कानाचे विकार निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण होत असल्याचा बोलबाला आहे. पाप करून गेलेल्या ठेकेदाराच्या पापाचे भोग मांडवीकरांना भोगायला लागत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार
कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद
रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप
रत्नागिरी नगरपालिकेच्या ठेकेदाराची चुकीच्या कामामुळे मांडवीकरांना मनस्ताप!
- Advertisement -