Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Ratlam : मध्यप्रदेश मध्ये मालगाडी घसरली, लोकांनी डिझेल लुटले (video)

रतलाम : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात रात्री उशिरा झालेल्या रेल्वे अपघातात मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. (Ratlam)

यावेळी त्यातील एक डिझेल टँकर उलटला. टँकरमधून डिझेल गळती होण्यास सुरुवात झाली आणि ते नाल्यात वाहून जावू लागले. आणि आसपासच्या लोकांमध्ये डीझेल चोरण्याची होड लागली. बादल्या,प्लॅस्टिकची भांडी घेऊन लोक डिझेल भरत होते.

---Advertisement---

या अपघातामुळे २ ट्रेन प्रभावित झाल्या ५ ट्रेन्सचे वेळापत्रक बदलण्यात आले. ही घटना रतलाम रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर दूर मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावरील अप ट्रॅकवर गुरुवारी रात्री १० वाजता घडली. उलटलेल्या टँकर मधून मोठ्या प्रमाणात डिझेल गळती होत होती.

आसपास गर्दी जमा होत असताना डिझेल चोरणाऱ्या लोकांना सुरक्षिततेसाठी वारंवार रेल्वे सुरक्षा दलाचे जवान इशारा देत होते. घटनास्थळावरून गर्दी हटवण्यासाठी आरपीएफला कसरत करावी लागत होती. (Ratlam)
अपघात झाल्याचे भान विसरून लहान मुलांपासून ते वुद्धांपर्यंत सर्वांनीच डिझेलची सर्रास लूट केली. महिलांनीही घरातील भांडीसह डिझेलची लूट सुरू केल्याचे पाहून रेल्वे प्रशासनही वैतागून गेले.


---Advertisement---

Related Articles

- Advertisement -

Latest Articles