Wednesday, February 5, 2025

मुदतबाह्य औषधांची राजरोसपणे विक्री; डॉक्टर साहेब तालुक्यात लक्ष द्या ! – जनतेची मागणी

अहमदनगर : मुदतबाह्य औषधांची राजरोसपणे विक्री होत असल्याची तक्रार अकोले तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे भारतीय ट्रायबल पार्टी जिल्हा प्रभारी डॉली डगळे यांनी पुराव्यानिशी एका निवेदनाद्वारे  केली आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात राजरोस पणे सर्रास दिवसा ढवळ्या मुदतबाह्य औषधांची विक्री होताना आढळून येत आहे. चाळीस गाव डांगाणाची राजधानी म्हणून ओळख आसलेल्या राजूर गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने आदिवासी समाजबांधव व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रूग्णाचे नातेवाईक खाजगी मेडिकल स्टोअर मधून औषधे खरेदी करतात मात्र घाई घडबडीत औषधांची मुदत तारीख पाहिली जात नाही.

डॉक्टर साहेब तालुक्यात लक्ष द्या, असेही निवेदनात म्हटले आहे. तालुका आरोग्य अधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles