Sunday, December 22, 2024
Homeराजकारणरामदास आठवले यांचा मणिपूर येथील उमेदवार थोडक्यात हरला ! अपक्षाने मारली बाजी!

रामदास आठवले यांचा मणिपूर येथील उमेदवार थोडक्यात हरला ! अपक्षाने मारली बाजी!

 

सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मणिपूरमध्ये सध्या भाजप आघाडीवर असल्यामुळे राज्यात कमळ पुन्हा एकदा फुलणार असल्याचे दिसतंय. मणिपूरमधील विधानसभेच्या 60 जागांची मतमोजणी सुरू आहे. यामधील काही जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभेतील निवडणुकीमध्ये फारसे यश न मिळालेला पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) मणिपूरमधील एका मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसपेक्षा भारी ठरला आहे. पण रिपाइंचा मणिपूरमधील या उमेदवाराची संधी काही मतासाठी हुकली असून अपक्षाच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

पंजाब व्यतिरिक्त सगळीकडे भाजप चे कमळ उमलले !

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा पक्ष रिपाइंचे उमेदवार महेश्वर थौनॉजम मणिपूरमधील किशमथोंग विधानसभा मतसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतमोजणीच्या सुरुवातीला थौनॉडम बाजी मारतील अशी स्थिती निर्माण झाली होती. पाच दशकानंतरचा रिपाइंचा महाराष्ट्रबाहेरच्या राज्यातील हा पहिलाच विजय होणार होता. याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन करण्याची घोषणा केलेल्या रिपाइं पक्षाचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आमदार होते. पण या पक्षात गट निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर कधी एखादी जागा जिंकून येण्याचे यश मिळाले नव्हते. त्यामुळे मणिपूरमधील किशमथोंग ही जागा रिपाइंसाठी ही महत्त्वाची होती. याकडे आंबेडकरी अनुयायींचे लक्ष लागले होते. पण काही मतांसाठी महेश्वर थौनॉजम यांना पराभूत स्विकारावा लागला.

संबंधित लेख

लोकप्रिय