माजलगाव, (ता.१७) : पेट्रोल, डिझेल दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजलगाव तालुका कमिटीच्या वतीने तालुका सेक्रेटरी कॉ. मुसद्दीक बाबा सर यांच्या नेतृत्वाखाली आज माजलगाव शहरातून मोटार सायकल रॅली काढून तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी माकपचे जिल्हा सचिवमंडळ सदस्य कॉ. मोहन जाधव, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. ऍड. सय्यद याकूब, कॉ.बळीराम भुम्बे सह अनेक पक्ष कार्यकर्ते निदर्शनेत सामील झाले होते.
केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. खते, औषधी व बी-बियाणांचे भाव वाढले आहेत. डाळी, गोडतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत सतत वाढ होत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या भांडवलदारी धोरणाचा हा परिपाक आहे. त्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गुरुवारी १७ जून रोजी देशभरात रॅली व निदर्शनाची हाक दिली होती. त्यास प्रतिसाद देत आज माकपच्या वतीने माजलगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत सायकल व मोटारसायकलची रॅली काढण्यात आली. यावेळी पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा. डाळी, गोडतेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा. खतांवरील सबसिडी चालू करून खतांचे भाव कमी करा. शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करा. शेतकऱ्यांना विनाअट, विना व्याज तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर करा. अशा घोषणा देत मोटार सायकल रॅली तहसील कार्यालयावर गेली. तिथे जोरदार निदर्शने करण्यात आली. व मागण्यांचे निवेदन तहसीलदार माजलगाव यांना देण्यात आले.
यावेळी माकपचे तालुका सेक्रेटरी कॉ. मुसद्दीक बाबा सर, माकपचे जिल्हा सचिवमंडळ सदस्य व डीवायएफआयचे राज्य सहसचिव कॉ. मोहन जाधव, ऍड.सय्यद याकूब, कॉ. बळीराम भुम्बे आदींनी आंदोलनास संबोधित केले. त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व भांडवलदारी धोरणाचा निषेध केला.
यावेळी माकपचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. सुहास झोडगे, कॉ. सादेक पठाण, कॉ. शिवाजी कुरे, कॉ.मुस्तकीम शेख, कॉ. शांतीलाल पट्टेकर, कॉ.पप्पू हिवरकर, कॉ.भगवान पवार, सय्यद फारूक, कॉ.शेख चुन्नू, कॉ.शेख मेहबूब, कॉ.रोहिदास जाधव, बाबा पवार, कॉ.अशोक राठोड, महिवाल लांडगे, सय्यद अली, सय्यद रफिक, कॉ.शेख निसार, शादाब खान, कॉ.शेषराव आबुज, कॉ.एकनाथ सक्राते, दिनकर जोगडे, मेहंदी हसन आदीसह उपस्थित होते.