Tuesday, October 8, 2024
Homeविशेष लेखRaktchandan : बहुगुणी बहुमूल्य दुर्लक्षित वृक्ष - रक्तचंदन

Raktchandan : बहुगुणी बहुमूल्य दुर्लक्षित वृक्ष – रक्तचंदन

भारत हा जैव-विविधतेच्या बाबतीत जगातील महत्वाचा देश आहे. आपल्या देशात वनस्पतीच्या 18 हजार आढळणाऱ्या प्रजातीपैकी सुमारे 7 हजार पेक्षा जास्त वनस्पती, वृक्ष, वल्लरी आयुर्वेद, युनानी, सिद्धी आणि होमिओपोथी यासारख्या प्रणालीमध्ये औषधासाठी वापर केला जातो. भारतामध्ये औषधी वनस्पतीच्या सुमारे 1187 प्रजाती व्यापारात असल्याचा अंदाज असून, त्यापैकी 142 प्रजातीच्ये वर्षिक उत्पादन प्रमाण 100 टन प्रती वर्षापेक्षा जास्त आहे.(Raktchandan)

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या गाजलेल्या चित्रपटा कथेला रक्तचंदन या वृक्षाच्या तस्करीची पार्श्वभूमी होती. चित्रपटात घेतलेली कहाणी ही खोटी नसून ती एक रियल कहाणी आहे. रक्तचंदन या वृक्षाची दुर्मिळ लागवड असल्याने त्याची जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने तस्करी फार होते.

हिंदू धर्मात चंदनाचा झाडाचे खूप महत्त्व आहे. पूजाअर्चाकरीता चंदनाच्या खोडाचा वापर होतो.रक्त चंदनाचे झाड हे इतर झाडाच्या तुलनेत फार वेगळे आहे हे झाडे मुख्यतः आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांत पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगांमध्ये आढळतात.

जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते. हे झाड सावकाश वाढतं, त्यामुळे त्याच्या लाकडाची घनताही अधिक असते.
रक्तचंदनाचे झाड हे सावकाश वाढत असल्याने ते एकदम भरभक्कम होते. त्यामुळे ते इतर झाडाच्या खोडासारखं पाण्यावर तरंगत नाही. त्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते, त्यामुळे या झाडाचे खोड हे पाण्यात बुडते. (Raktchandan)

रक्तचंदन हा एक वेगळ्या जातीचा वृक्ष आहे. रक्तचंदनाचे लाकूड हे लाल असते पण त्याला पांढऱ्या चंदन प्रमाणे सुगंध नसतो. रक्तचंदनाचा वापर हा महागडे फर्निचर तयार करण्यासाठी तसेच सजावटीचे सामान तयार करण्यासाठी केला जातो.

चंदन कुळातील वृक्षांची बेसुमार तोड परंतु त्या प्रमाणात लागवडी न झाल्याने जागतिक बाजारपेठेतील मागणी भारत पुरी करण्यास असमर्थ आहे. लागवड न होण्याचे मूळ कारण म्हणजे चंदन लागवड बद्दल असलेले गैरसमज, विशेषतः भारतात असलेल्या सरकारी जाचक अटी यामुळे चंदनकुळातील वृक्ष लागवडीकडे कुणी वळत नाही. इंडोनेशिया हा देश निर्यातीत अग्रेसर होत आहे त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया व चीन ह्या क्षेत्रात पुढे येऊ पाहत आहे. गंमतीचा भाग म्हणजे हे सर्व देश भारतीय वंशाचे चंदन वृक्ष लावून त्यांची जोपासना करून चंदन तेल व लाकडाची निर्यात करत आहेत. तसेच त्याचा नैसर्गिक रंगाचा वापर हा कॉस्मेटिक्स मध्ये तयार करणाऱ्या काही वस्तूंसाठी वापरला जातो. रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत ही साधारणपणे तीन हजार रुपये प्रति किलो आहे. (Raktchandan)


“रक्त चंदन” म्हणजे नेमके काय?

रक्तचंदन हा प्राचीन वृक्ष आहे. रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आले आहे. लाकूड रंगाने गडद लाल, कठीण असून ते चवीला तुरट असते. तसेच त्याला सहजासहजी वाळवी लागत नाही. लाकूड सहाणेवर उगाळून त्याचा लेप सांधेदुखी, सूज व त्वचादाह कमी करण्यासाठी लावतात. पानांचा रस कृमिनाशक व सूक्ष्मजीवरोधी आहे. जखमा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून सँटॅलीन नावाचे रंगीत राळेसारखे रसायन मिळते. त्याचा उपयोग औषधांना रंग येण्यासाठी आणि लाकूड, रेशीम व चामडे रंगविण्यासाठी करतात. (Raktchandan)

खोडाच्या मध्यभागातील लाकडापासून बाहुल्या, दागिन्यांच्या पेट्या, देवांच्या मूर्ती,माळा, बुद्धिबळाच्या सोंगट्या व फर्निचर अशा विविध वस्तू तयार करतात. रक्तचंदन या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तो तोडण्यावर बंदी घातली आहे.

हे रक्तचंदन एवढं किमती का आहे?

आपण नेहमी जे चंदन वापरतो, त्यापेक्षा हे चंदन वेगळं कसं आहे? या चंदनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तस्करी मोठ्या प्रमाणात होते. लाल रंगाच्या या चंदनाचा वापरही पूजा अर्चेसाठी होतो. पांढऱ्या चंदनाचा वापर सामान्यपणे वैष्णव पंथातील लोक करतात, तर रक्तचंदनाचा वापर हा शैव आणि शाक्तपंथीय मोठ्या प्रमाणावर करतात. ”रक्त चंदन ” म्हटले की बहुतेक जणांना चंदनाचाच प्रकार असावा, असे वाटते.

परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते. सफेद चंदनाचे फेस पॅक, अगरबत्ती, किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन असमानाचा फरक आहे. (Raktchandan)

रक्त चंदनाला वैज्ञानिक भाषेत टेरोकार्पस सेंटनांस असेही संबोधले जाते. मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते. चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चांदनाप्रमाणे रक्त चंदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही. (Raktchandan)

रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो. रक्तचंदन वृक्ष 8 मीटर पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. तीन वर्षांत 5 मी.पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचे खोड सरळ वाढत असून साल खडबडीत असते. पाने संयुक्त व लहान असून त्याच्या लहान संयुक्त पानाला बहुधा तीन एकाआड एक दले असतात. प्रत्येक दल 3-9 सेंमी. लांब असते. फुलोऱ्यात फुले थोडी असून ती पिवळी आणि लहान असतात.

निदलपुंज पाच, संयुक्त व हिरव्या दलांनी बनलेला असून दलपुंजात पाच मुक्त असमान गुलाबी पाकळ्या असतात. पुमंगात 10 पुंकेसर असून त्यांपैकी नऊ संयुक्त व एक मुक्त असते. जायांग ऊर्ध्वस्थ असून त्यात एकच अंडपी असते. परागण कीटकांमार्फत होते. शेंग लहान, चपटी, गोलसर व पंखयुक्त असते. पिकल्यावर ती फुटते. बिया लहान व शेंदरी असतात.

रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आले आहे. लाकूड रंगाने गडद लाल, कठीण असून ते चवीला तुरट असते. तसेच त्याला सहजासहजी वाळवी लागत नाही. सर्वप्रथम चंदन कुळातील वृक्ष लागवडी साठी कोणतीही सरकारी अथवा संस्थेची परवानगी लागत नाही. फक्त लागवड केल्या नंतर तलाठ्या कडून फक्त सातबारावर नोंद करून घ्यावी लागेल आणी तोडताना फाॅरेस्ट डिपार्टमेंट ची परवानगी लागते. हेक्टरी रू. 45,000 अनूदान सरकार कडून 3 टप्यात मिळते.


रक्तचंदन लाल सोने आहे

1) रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते.
2) हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते.

3) मुकामार,शरीरावरील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदन वापरतात. मुकामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारतात. अशावेळी रक्तचंदन सहाणेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावतात व तो लेप वाळल्यावर त्यावर रुग्णास सोसवेल इतक्या गरम मिठाचा शेक द्यावा.

4) पानांचा रस कृमिनाशक व सूक्ष्मजीवरोधी आहे. जखमा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करतात.

5) रक्तचंदनाच्या लाकडापासून सँटॅलीन नावाचे रंगीत राळेसारखे रसायन मिळते. त्याचा उपयोग औषधांना रंग येण्यासाठी आणि लाकूड, रेशीम व चामडे रंगविण्यासाठी करतात.

6) खोडाच्या मध्यभागातील लाकडापासून बाहुल्या, दागिन्यांच्या पेट्या, देवांच्या मूर्ती, बुद्धिबळाच्या सोंगट्या व फर्निचर अशा विविध वस्तू तयार करतात.

7)रक्तचंदन या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते.

8) जरी या झाडाला सुंगध नसला तरीही या झाडाचे लाकूड मात्र फारच उपयोगी असते. किमती फर्निचर बविण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो.

त्यामुळे या लाकडाला चीन, जपान, सिंगापूर देशात भरपूर मागणी असते. हे झाड भारतातील आंध्रप्रदेश राज्यातील डोंगराळ भागात प्रामुख्याने आढळते. या झाडाला भरपूर मागणी असल्याने या झाडांची लागवड करून भरपूर नफा कमावण्यासाठीचा व्यवसाय वाढीस लागला आहे.

महाराष्ट्रात चंदन तस्करांच्या टोळ्या पकडल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात.
चंदनकुळातील वृक्ष लागवड करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांना झाडे मुळासकट चोरणाऱ्या टोळ्यापासून भीती असते,त्यांना झाडांचा विमा काढावा लागतो.नगदी पिकाच्या या काळात मोठ्या प्रमाणावर रक्तचंदन लागवड करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रोत्साहन मिळत नाही.

तसेच किमान 15 वर्षे या झाडाच्या वाढीचा काळ आहे,सर्वप्रथम चंदन कुळातील वृक्ष लागवडी साठी कोणतीही सरकारी अथवा संस्थेची परवानगी लागत नाही. फक्त लागवड केल्या नंतर तलाठ्या कडून फक्त सातबारावर नोंद करून घ्यावी लागेल आणि तोडताना फाॅरेस्ट डिपार्टमेंट ची परवानगी लागते. हेक्टरी रू. 45,000 अनूदान सरकार कडून 3 टप्यात मिळते.

धार्मिक कार्यात उपयोग

चंदनाच्या लाकडाप्रमाणे याचे लाकूड होम हवन विधीमध्येदेखील करण्यात येतो.याच्या नैसर्गिक रंगाचा सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी देखील उपयोग केला जातो. रक्त चंदनाचे विविध फेसपॅक बाजारात उपलब्द्ध आहेत. याच्या वापराने चेहऱ्यावरील त्वचा चमकदार आणि उजळ बनते. ही भारतात उगवणारी एक जागतिक स्तरावर कॉस्मेटिक व औषध निर्माण,फर्निचर आदी विविध उद्योगात उपयोगी आहे.अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. (Raktchandan)

भारतीय शेतकऱ्यांना बहुगुणी,बहुमूल्य उपयोगी चंदनकुळातील वृक्षशेतीच्या लागवडीसाठी उत्तेजन देण्यासाठी विशेष प्रयत्न शासकीय स्तरावर झाले तर पुढील दशकात जल,जंगल वृक्षवल्लरीच्या क्षेत्रात तरुण शेतकरी क्रांती घडवतील.

संकलन-क्रांतीकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय