नवी मुंबई : वाशी एपीएमसी मार्केट येथे ट्रकचालकाना राख्या बांधून औक्षण करण्यात आले. मंथन फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी ट्रकचालकांना त्यांचे जीवन सुखी व आनंदी व्हावे, एचआयव्ही पासून बचाव व्हावा, ट्रक चालक सोबतच त्यांच्या परिवाराला देखील एचआयव्ही पासून दूर ठेवणार व त्यांची रक्षा करण्याचे वचन दिले. मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट यांच्या संकल्पनेतून हा अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी ८०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर, राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालविणाऱ्या ट्रक चालक यांना एचआयव्ही पासून बचाव, निरोध चा वापर करावा, तपासणी करून घ्यावी व आपल्या कुटुंबासाठी सुखरूप प्रवास करावा असा संदेश दिला.
विशेष म्हणजे सामाजिक संदेश देणारा राख्या मंथन फाउंडेशन कार्यकर्त्यांनी बनवल्या व ट्रक चालक दादा यांना त्या बांधण्यात आल्या.राखीच्या माध्यमातून सामाजिक खालील संदेश देण्यात आला.
१. एक दो एचआयव्ही को रोक दो,
२. नियम पाळा एचआयव्ही टाळा,
३. कंडोमचा वापर करा एड्स लावा पळवून
४.दारू पिऊन गाडी चालवू नका
५. मैत्री करावी कंडोम शी नसेल भीती एड्स ची
तसेच एचआयव्हीसह , गुप्तरोग व क्षयरोग याबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित ट्रक चालक व हेल्पर यांना खूप छान वाटले. अनोखा उपक्रम राबविल्यामुळे त्यांनी कौतुक केले व सामाजिक संदेश देऊन ट्रक चालक यांनी वरील संदेश नक्की पालन करू असे सांगितले.
मंधन फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रमिला खराडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व तसेच ज्योती खरात, शीतल कोळी, हर्षदा ससाणे, प्रिया दोडके, ज्योती पवार, रोहिणी वाघमारे, आयेशा मलकानी, रूक्सार कुरेशी, मनोज बुद्धम सर्व कार्यकर्ते व पिअर लीडर यांच्यामुळे कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला.