Tuesday, April 23, 2024
Homeजिल्हाराकेश वानखेडे यांच्या 'गिनिपिग' कादंबरीचे रविवारी 11 जुलै रोजी प्रकाशन

राकेश वानखेडे यांच्या ‘गिनिपिग’ कादंबरीचे रविवारी 11 जुलै रोजी प्रकाशन

नाशिक : नाशिकचे सुपुत्र राकेश वानखेडे यांच्या “पुरोगामी” कादंबरीच्या यशानंतर ‘गिनिपिग ‘ प्रकाशनासाठी सज्ज झाली आहे. दिनांक 11 जुलै रविवारी सायंकाळी सहा वाजता कादंबरीकार साहित्य अकादमी विजेते सुप्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे ( परभणी ) तथा समीक्षक व कादंबरीकार डॉक्टर प्राचार्य महेंद्र कदम ( सोलापूर ) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 

राकेश वानखेडे यांची “पुरोगामी” ही कादंबरी नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे. तसेच तिला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. पुरोगामी कादंबरी नंतर पुढे काय याबाबत वाचकांमध्ये आतुरता होती. दिनांक 11 जुलै रोजी प्रकाशित होणाऱ्या ‘गिनिपिग ‘ या कादंबरीचे देखील वाचक जाणकार अभ्यासक तथा समीक्षक उत्स्फुर्तपणे स्वागत करतील असा लेखकाने विश्वास व्यक्त केला आहे. ग्लोबलायजेशन तसेच खाजगीकरण या प्रक्रियेमध्ये सामान्य माणसाचे होणारे वस्तूकरण या विषयाला वाचा फोडणारी ही कादंबरी आहे. 

जागतिकीकरणाच्या तीस वर्षाच्या संक्रमण अवस्थेनंतर चा लेखाजोखा किंवा सिंहावलोकन मांडणाऱ्या या महत्त्वपूर्ण कादंबरीचे प्रकाशन समारंभास ऑनलाइन पद्धतीने होणार असुन परिसरातील जाणकार वाचकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समाज प्रबोधन संस्था नाशिक श तसेच प्रगतिशील लेखक संघ शाखा नाशिकचे अध्यक्ष कवी प्रमोद अहिरे, सचिव प्रल्हाद पवार यांच्या वतीने  करण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय