पिंपरी चिंचवड : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित, हिंदुस्थान अन्टिबायोटिक्स स्कूल (माध्यमिक विभाग ) पिंपरी पुणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
प्रतिमेचे पूजन पालक तसेच मुख्याध्यापक एकनाथ बुरसे व अन्य पदाधिकाऱ्यां समवेत करण्यात आले. राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचे गुणगान गाणारा पोवाडा व समूहगीताचे गायन शाखेतील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले. सर्व जगताला भारतीय वेदांत आणि योगाचे दर्शन घडविणाऱ्या तत्वज्ञ स्वामी विवेकानंदांच्या अभूतपूर्व व अलौकिक कार्याची ओळख रमेश शेलार यांनी चिंतन सदरात गोष्टीरुपात सांगितली.
मोरवी खंबायत या विद्यार्थिनीने जिजाऊ मातेचे स्वगत सादर केले. या कार्यक्रमाचे आयोजन शालेय दिन विशेष विभागाच्या वतीनं मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
– क्रांतिकुमार कडुलकर
हेही वाचा ! पिंपरी चिंचवड : राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू – बाबा कांबळे
हेही वाचा ! पुणे : जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन
हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा