(मुंबई) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर (दि.७) संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. त्यावर अनेक क्षेत्रातून निषेध केला जात आहे, राजकीय वर्तुळातून देखील विविध पडसाद उमटत असताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख यांनी ‘राजगृह’ असुरक्षित हे ‘वर्षा’ च्या ‘मातोश्री’ चे अपयश असल्याची टीका केली आहे.
अशातच वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या आणि महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या सदस्या दिशा शेख यांनी फेसबुकच्या माध्यमातून म्हंटले आहे कि, ‘राजगृह’ असुरक्षित हे ‘वर्षा’ च्या ‘मातोश्री’ चे अपयश आहे. तसेच त्यांनी पुढे म्हंटले आहे की, देशाची अस्मिता असलेलं ‘राजगृह’ जर राज्य प्रशासन सुरक्षित ठेऊ शकत नसेल तर, तुमची सुरक्षा व्यवस्था काय फक्त नजानत्या ‘राज्याला’ मुजरा करायला पोसलीय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.