तासगाव : राजर्षी शाहू महाराज जयंती सोहळ्याच्या निमित्ताने स्वराज्य पक्ष सांगली जिल्हा च्या वतीने दि.०२/०७/२०२३ रोजी पंचायत समिती हाॅल तासगाव मध्ये शालेय पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या, एकुण दीडशे विद्यार्थी विद्यार्थिनीनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

या कार्यक्रमाचे संयोजन स्वराज्य पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा.अमोल कदम व मा.प्रमोद पाटील यांनी केले होते, प्रथम पारितोषिक कु.तनया तुषार शेट्टी, द्वितीय पारितोषिक कु.आरोही संजय भंडारे, तृतीय पारितोषिक श्लोक संजय माने व उत्तेजनार्थ पारितोषिक कु.अवनी मल्हारी पाटील यानी पटकाविले, या स्पर्धेचे परिक्षक म्हणून मा.आनंदा गेजगे, मा. पत्रकार विक्रांत पाटील व मा: प्रकाश कांबळे सर यांनी काम पाहिले, आलेल्या मान्यवरांचे स्वागत जेष्ठ पत्रकार शशिकांत डांगे केले तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे सरांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पलूस चे शिक्षण विस्तार अधिकारी मा: प्रकाश कांबळे सर व तुरची गावचे आदर्श सरपंच मा:विकास (भाऊ) डावरे, स्वराज्य पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष मा दिपक मुळीक, मा. बापुसो क्षिरसागर, अॅड.संजय धर्माधिकारी, आशिष मुळीक, मा: लक्ष्मण भाऊ मडले , शहाजी जाधव, अब्दुल मुलाणी, धनाजी मदने, अभिजित कदम, प्रथमेश पाटील, दशरथ मोरे, भरत (नाना) थोरात, प्रसाद वारे, अक्षय शिंदे विद्यार्थ्यांचे पालक , शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते, तर आभार पत्रकार विक्रांत पाटील यांनी मानले.
लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू
कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा
महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या


