24 तासाच्या आत चोरट्यांना केले जेलबंद
कोल्हापूर / यश रुकडीकर : येथील कृषी महाविद्यालय आवारात घडलेल्या गुन्हाचा शोध शिताफीने करत राजारामपुरी पोलिसांनी चोरट्यांना 24 तासाच्या आत गजाआड केले.
कृषी महाविद्यालय येथे असणाऱ्या मुलींच्या वसतिगृहात सुनिता जनार्दन कांबळे या सफाई काम करतात. दि.21 जून 2021 ला सायंकाळी त्या आपल्या घरी जात असताना दोन इसम गाडीतील पेट्रोल संपले असल्यामुळे ती बंद पडली आहे अशी खोटी बतावणी करत होते. त्याचवेळेस मागे बसलेल्या इसमाने सुनिता जनार्दन कांबळे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तसेच सोन्याच्या लक्ष्मी हारा पैकी अर्धे दागिने जबरदस्तीने हिसडा मारून पळवून नेले.
याबाबतची फिर्याद सुनिता जनार्दन कांबळे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.तपासाच्या अनुषंगाने राजारामपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक एस.एल. डुबल यांनी तपासाच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे व गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ शेख, पो.कॉ सावंत, पो.कॉ ठोंबरे, पो.कॉ सावंत, पो.कॉ शिरगावकर यांनी सदर गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेऊन टेंबलाईवाडी मेन गेट समोर च्या गेटसमोर ताब्यात घेतले.
शुभम प्रभाकर कबाडे व शुभम गणेश शिपुगडे यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हेगारांकडून सुमारे 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सिताराम डुबल, पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस हेडकॉन्स्टेबल समीर शेख, पोलिस कॉन्स्टेबल संदीप सावंत, युक्ती ठोंबरे, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर यांनी केली.