Wednesday, February 19, 2025

राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज तर “या” ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता

मुंबई : गेल्या काही दिवसांत देशभरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. देशात तापमान वाढत असताना बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरातील वातावरणात बदल झाला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या सॅटेलाईट इमेजनुसार, महाराष्ट्र, गोवा याठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच, अरबी समुद्रामध्ये पूर्व मोसमी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच १९ ते २१ मार्च या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याने पुढील दोन दिवस विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने आज अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर परिसरात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles