Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयरेल्वे भरती घोटाळा : बिहारमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, रेल्वेचे इंजिन पेटवल

रेल्वे भरती घोटाळा : बिहारमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, रेल्वेचे इंजिन पेटवल

Photo : Twitter

पटना : बिहारमध्ये पटना-आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालावरून दोन दिवसांपासून बिहारमधील अनेक रेल्वे स्थानकांवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. 

रेल्वे मंत्रालयातील रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालातील गैरप्रकाराविरोधात नाराज विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करत रेल्वे ट्रॅक जाम केला. १४ जानेवारी रोजी लागलेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालात घोटाळ्या करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

२०२२ पद्म पुरस्कारांची घोषणा, असे आहेत पुरस्काराचे मानकरी

 

नवजात मुलासाठी आईने प्राण दिल्याच्या व्हायरल पोस्टचे वाचा सत्य !

निकालातील या गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी बिहारमधील विविध रेल्वे स्थानकांवर आंदोलन सुरू केल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्यावेळी सीतामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. पाटणामध्ये पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तसेच लाठीचार्ज देखील करावा लागला आहे. 

दरम्यान, आंदोलकांनी आरा स्टेशनजवळ एका ट्रेनच्या इंजिनला आगही लावून दिली. तसेच रेल्वे भरती बोर्डा (RRB) विरुद्ध संतप्त घोषणा दिल्या. 

आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !

या हिंसेनंतर रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे कि, रेल्वेच्या नोकरीसाठी इच्छुकांनी रेल्वे रुळांवर आंदोलन करणे, रेल्वेच्या कामकाजात व्यत्यय आणणे आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणे यासारख्या बेकायदेशीर कामांमध्ये आढळून आल्यास त्यांना आजीवन रेल्वेच्या नोकरी पासून वंचित ठेवले जाईल, असे म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या खर्च विभागाच्या 590 जागा, आजच अर्ज करा!

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

संबंधित लेख

लोकप्रिय