ट्राफिक जाम असताना सुद्धा टोल वसुली सुरु होती.. सज्जड दम देत स्वतः गाड्या सोडल्या.
रायगड/क्रांतिकुमार कडुलकर:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्याच्या व्यवस्थापनाला ठाकरी बाणा दाखवत रविवारी खडे बोल सुनावले. पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागल्याने राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरले.
पिंपरी चिंचवड येथील १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते मुंबईकडे निघाले असतांना हा प्रकार घडला. टोलनाक्यावरील यलो लाइनच्या पुढे रांगा गेल्यास वाहने विना टोल सोडली जातील असे आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनी टोलनाक्या व्यवस्थापकाशी चर्चा केली.
पिंपरी चिचंवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलो मिटरच्या रांगेत तासन तास ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या ॲम्बुलन्सला रस्ता करुन दिला आणि ठाकरे शैलीत दम देऊन तासन तास अडकलेला ट्राफीक काही क्षणात सोडवला गेला.