Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या कुटुंबियांना भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. परभणीतील घटनांमुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. मात्र आता थेट राहुल गांधी येणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
10 डिसेंबर रोजी परभणी रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याने शहरात हिंसाचार उसळला होता. या घटनेनंतर 12 डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशीसह 300 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, न्यायालयीन कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा (Somnath Suryavanshi) मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पोलिसांनी मात्र छातीत दुखत असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले. शवविच्छेदन अहवालात शरीरावर अनेक जखमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
Rahul Gandhi परभणी दौऱ्यावर
या पार्श्वभुमीवर राहुल गांधी सोमवारी, 23 डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीहून नांदेड विमानतळावर येतील. दुपारी पावणे तीन वाजता ते परभणीत पोहोचतील. येथे ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतील व त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते नांदेड विमानतळावरून दिल्लीला परत जातील.
राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे देखील भेट देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला असून, गांधींच्या दौऱ्यादरम्यान यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते खाते
खूशखबर : बँकेत तब्बल 13 हजार पदांसाठी मेगा भरती
पुणे महानगरपालिके अंतर्गत 179 पदांसाठी भरती ; विनापरीक्षा भरती
ITI, डिप्लोमा, इंजिनिरिंग, पदवीधरांसाठी विविध पदांची भरती
लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एकनाथ शिंदे विधानपरिषदेत काय म्हणाले वाचा !
‘मराठी माणसं भिकारी आहेत’ म्हणत कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला
बसमध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस रणरागिणीने दिला चोप
IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी
कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
तामिनी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर