Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आर माधवन च्या मुलास जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, देशाचे नाव उंचावले.

---Advertisement---

पुणे: रहना हैं तेरे दिल मे फेम अभिनेता आर माधवनच नेहमी चर्चेत नसतो पण त्याचा मुलगा नेहमीच चर्चेत असतो.  एक उत्तम जलतरणपटू म्हणून तो ओळखला जातो. वेदांत असे आर माधवनच्या मुलाचे नाव आहे. कोपेनहेगनमध्ये डेन्मार्क ओपनमध्ये आधी रौप्य पदक मिळवलं तर आता सुवर्ण पदक मिळवत देशाची मान उंचावली.

---Advertisement---

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

वेदांतचा एक व्हिडीओ आर माधवनने शेअर केला आहे. आर माधवनने शेअर केलेल्या या व्हिडीओत वेदांच सुवर्ण पदक घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या कृपेने विजयाची घोडदौड सुरुच आहे. आज वेदांतने ८०० मीटरमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. कोच प्रदीप सरांचे आभार. स्विमिंग फेडरेशनच्या संपूर्ण टीमचे आभार, ” असे कॅप्शन आर माधवनने दिले आहे.

12 वी पास व पदवीधारांना रेल्वेत नोकरीची संधी, आजच अर्ज करा

वेदांतने जलतरणात पदक पटकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, वेदांतने बेंगळुरू येथे झालेल्या ४७व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार रौप्य पदके आणि तीन कांस्यपदके पटकावली होती. याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये, वेदांतने लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते आणि त्याच्या कामगिरीमुळेच लोकांनी माधवनच्या मुलाची तुलना अनेक स्टार किड्सशी करायला सुरुवात केली आणि म्हटले की हा फरक आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles