सांगली : पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक 2020 च्या निवडणूक सुटा व एमफुक्टो च्या वतीने प्रा. डॉ. सुभाष आत्माराम जाधव हे निवडणूक लढवत आहेत.
संघर्षशील पुरोगामी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलेले जाधव यांनी सांगली जिल्हा प्रचार दौरा सुरू आहे. सांगली जिल्ह्यात त्यांना शिक्षक व प्राध्यापक मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रचारानिमित्ताने आज दि. 24 नोव्हेंबर रोजी प्रा. डॉ. जाधव यांनी सांगली येथील कोल्हापूर चर्च काऊंंसिल प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये भेट देऊन तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला आवाहन करण्यात आले.
यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कांबळे व माध्यमिकचे मुख्याध्यापक काळे व संस्थेचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र चोपडे व प्रा. माधुरी देशमुख प्रा. डॉ. गजानन चव्हाण हे उपस्थित होते. तसेच शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांनी व संस्थेचे संचालकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.