पूर्वी केवळ निवडक दाक्षिणात्य सुपरस्टारचे चित्रपट बहुभाषिक स्तरावर, देशभर प्रदर्शित व्हायचे. विविध दाक्षिणात्य भाषांसह हिंदीत सिनेमा डब करून मूळ प्रदर्शनाच्या तारखेलाच तो उत्तर आणि पश्चिम भारतात प्रदर्शित व्हायचा. यात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे नाव अग्रेसर होते आणि आहे. गेल्या तीन-चार वर्षांत हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अंतर कमी झाले आहे. परिणामी, बहुतांश दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणि हिंदी सिनेमे दाक्षिणात्य भाषेत प्रदर्शित होत आहेत. यापूर्वीही दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत डब होत; पण ते केवळ टीव्हीच्या पडद्यापुरते मर्यादित होते. आता चित्र बदलले आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याने आपल्या कक्षा रुंदावत, हिंदीत मोठ्या पडद्यावर दमदार ‘एंट्री’ घेतली आहे. मूळ सिनेमा तेलगू भाषेत आहे. सिनेमाच्या हिंदी आवृत्तीमध्ये अर्जुनसाठी अभिनेता श्रेयस तळपदेचा आवाज वापरण्यात आला आहे. तो अर्जुनच्या भूमिकेला चपखल बसला आहे, एवढेच नव्हे, तर त्याला मराठी भाषेचा खास ठसकादेखील आहे. ही बाब नक्कीच मराठी प्रेक्षकांना या सिनेमाकडे आकर्षित करेल.
साऊथ इंडियनची आणखी एका लोकप्रिय जोडीचा घटस्फोट
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
हा सिनेमा दमदार अँक्शन भरलेला आहे. सिनेमाची गोष्ट आहे, तस्करी करण्यात पटाईत असलेल्या एका मजुराची. शेषाचलम जंगलाच्या शेजारच्या गावात राहणारा पुष्पाराज (अल्लू अर्जुन) हा एक स्वाभिमानी तरुण. त्याच्यासाठी ‘स्वाभिमान’ इतका महत्त्वाचा आहे, की त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. तस्करीच्या गैरमार्गातही तो स्वाभिमानाने वावरतो. सर्वसामान्य, रोजंदारीवर काम करणारा मजूर ते तस्करांचा म्होरक्या होण्यापर्यंतचा प्रवास हा पुष्पाराज कसा करतो, याची गोष्ट सिनेमात बारकाईने दाखवली आहे. बारकाईने यासाठी; कारण तीन तास लांबीचा हा गोष्टीचा पसारा लेखक दिग्दर्शक सुकुमार बंदरेड्डी याने मांडला आहे.
पडद्यावरचा हा सर्व पसारा खरेच गरजेचा होता का, असा विचार सिनेमा पाहताना डोक्यात येऊन जातो; कारण पटकथेतील सर्वाधिक वेळ पुष्पा केवळ मारामारी करत असतो. त्या अॅक्शनला काहीशी कात्री लावायला हरकत नव्हती. अनेक प्रसंग वारेमाप ताणले आहेत. शिवाय, ही अर्धीच गोष्ट आहे. ‘पिक्चर तो अभी बाकी है…’ अर्थात गोष्टीचा पुढचा भाग, सिनेमाचा ‘सिक्वेल’ येणार आहे. ‘पुष्पा-द-राइज’मध्ये पुष्पाराज हा तस्करांच्या टोळीचा प्रमुख बनतो आणि या मार्गात अनेक शत्रूदेखील निर्माण करतो. ते पुष्पाराजच्या चहूबाजूंना आहेत. ते शत्रू कोण? कसे? का? कशासाठी? कोणासाठी? जे जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहायला हवा.
१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती
सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत पडदा अर्जुनने व्यापलेला आहे. अभिनेता अल्लू अर्जुनचे दिसणे, वागणे, देहबोली, पडद्यावरील वावर आणि अभिनिवेश दमदार आहे. पुष्पाराजची भूमिका त्याने अचूक साकारली आहे.
खांद्याची एक बाजू वर करून चालणे, लक्षात राहते. व्यक्तिरेखेतील बारकावे स्वतः अर्जुन, दिग्दर्शक आणि वेशभूषाकाराने अचूक पकडले आहेत. परिणामी व्यक्तिरेखा पडद्यावर जितकी ‘लार्जर दॅन लाइफ’ दिसते, तितकीच ती सत्याशी जोडलेली आहे.
ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती
तांत्रिक बाबींमध्ये सिनेमा अव्वल आहे. प्रॉडक्शन डिझाइन सुंदर आहे. जंगलातील दृश्ये सिनेमेट्रोग्राफरने शिताफीने टिपली आहेत. सोबतच फाइट मास्टर आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी अॅक्शन दृश्ये कौशल्याने चित्रीत केली आहेत. सिनेमातील गाणी प्रेक्षकांना थिरकवणारी आहेत.
‘सामी.. सामी..’ हे गाणे विशेष लक्षात राहतं. सिनेमाच्या कथानकात अभिनेत्री रश्मीका मंदाना हिला फार वाव नव्हता; पण तिचे सौंदर्य मोहवून टाकते. सिनेमात ती लाली हिचे काम करते. सिनेमाची व्यावसायिक गणिते जुळवण्यासाठी आयटम साँगची भरही आहे. बाकी सर्व आलबेल आहे. ‘पुष्पा’ मनोरंजनाच्या दृष्टीने बघण्याजोगा आहे. बाकी, आपल्या श्रेयस तळपदेचा पुष्पाराजच्या तोंडी असलेल्या संवादातील ‘मराठी’ टच लाजवाब आहे.
महाराष्ट्र जनभुमी न्यूज तर्फे या चित्रपटाला रेटिंग 8/10
– रत्नदिप सरोदे