Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पूर्णा : डीवायएफआय कडून रेल्वेला आंदोलनाचा इशारा !

---Advertisement---

पूर्णा : आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवक संघटनेकडून पूर्णेतील स्टेशनद्वारा जनरल मॅनेजर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

---Advertisement---

डीवायएफआयने म्हटले आहे की, कोरोना काळात सर्वच जीवनमान ठप्प झाले होते त्यामुळे रेल्वे पण पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. आणि त्याचा गैरफायदा केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने उचलत त्यातील कित्येक गाड्या अदानी समूहाला विकल्या तसेच इंडियन ऑइल हे रिलायन्स कंपनीला विकले. खाजगीकरणाकडे रेल्वेला वळविण्याचा डाव केंद्र शासनाने रचला आहे. पहिल्या लाटेनंतर परिस्थिती निवळल्यावर रेल्वे विभागाने सर्वच गाड्या सुरु करण्याऐवजी काही विशेष गाड्याच सुरु केल्या होत्या आणि त्यांचे तिकीट भाडे सुद्धा सुमार पद्धतीने वाढविले होते. यात्रा गाड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर डीवायएफआय या संघटनेनी यात्रा गाड्या सुरु करणे, तिकीट काउंटर सुरु करण्यासाठी व तिकीट भाडे कमी करण्यासाठी बरीच निवेदने देऊन १६ फेबुवारीला पूर्णा रेल्वे स्टेशन येथे आंदोलन सुद्धा केले होते. पण लगेच कोरोनाची दुसरी लाट आली पण ती लगेच ओसरली. त्यानंतर रेल्वेने यात्रा गाड्यांऐवजी डेमो गाड्या सुरु केल्या पण ह्या गाड्यांचे भाडे मात्र एक्सप्रेस एवढे म्हणजेच नियमित भाड्यापेक्षा तीनपट भाडे वाढविले असे डीवायएफआयने म्हटले आहे.

डीवायएफआयने मागण्या केल्या आहेत की, आधी असलेल्या यात्रा गाड्या पूर्ववत सुरु करा, डेमो सुरूच ठेवायचीच असेल तर तिला मुंबईच्या लोकलसारखी सुरु करा, यात्रा गाड्यांचे भाडे एक्सप्रेसच्या भाड्याएवढे म्हणजेच तीन पट वाढविले आहे ते तीन पटीने कमी करा आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी तत्वावर नियुक्त करून त्यांची पिळवणूक थांबवा, रेल्वेचे खाजगीकरण पूर्णपणे थांबवा आदी मागण्यांना घेऊन आज डीवायएफआयच्या तरुणांनी रेल्वे जनरल मॅनेजर यांना पूर्णेतील स्टेशन प्रबंधक यांच्यामार्फत निवेदन पाठविले आहे.

निवेदनावर डीवायएफआयचे जिल्हा सचिव नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, सचिन नरनवरे, अजय खंदारे, जय एंगडे आणि महेंद्र गवळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles