Friday, December 6, 2024
Homeग्रामीणपूर्णा : DYFI तर्फे विविध मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर आंदोलन

पूर्णा : DYFI तर्फे विविध मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर आंदोलन

पूर्णा (परभणी)  : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे विविध मागण्यांना घेऊन पुर्णा येथे आज आंदोलन करण्यात आले.

शहरातील मुख्य रस्ता कायमस्वरूपी करा, शहरात एक बगीचा करण्यात यावे, नाल्यांची व कचऱ्याची नियमित सफाई करा व त्याचे नीट व्यवस्थापन करावे, इकबाल नगर येथील सभागृहाशी संबंधित समस्या सोडविण्यात याव्यात व खेळाच्या मैदानाचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे, या मागण्या लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. 

या आंदोलनात डीवायएफआयचे जिल्हा सचिव नसीर शेख, अमन जोंधळे, आंनद वाहिवळ, अमोल बलखंडे, भीमा वावळे, पांडुरंग दुथडे, हर्षवर्धन अहिरे, अजय खंदारे, जलील कुरेशी गंगाधर लोंढे, जाकेर शेख, जहिर, सोमेश सावळे, सय्यद फारुख, शेख अल्लाबक्ष, संदीप थोरात, आनंद कांबळे व अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय