Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Pune : महिलांनी उद्योग,व्यवसायात मोठ्या संख्येंने यावे – शैलेश रजपूत

फिक्की महिला आघाडीच्या वतीने उद्योजकता महिला मेळावा संपन्न

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : महिला प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर पार करीत आहेत यशस्वी होत आहेत . त्याप्रमाणेच आता महिलांनी उद्योग, व्यवसायात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचे मत पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत यांनी व्यक्त केले. Pune

फिक्की महिला आघाडीच्या वतीने महिला उद्योजकता मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. Women’s Entrepreneurship Forum

पुढे ते म्हणाले की ,आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी नव उद्योजकांना घडवण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत, बऱ्याच योजमार्फत अनुदानदेखील देण्यात येत आहे, अशा अनेक योजनांचा लाभ महिलांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. Pune news

या महिला उद्योजिकता मेळाव्याच्या समन्वयक सुरभि प्रकाश दीक्षित यांनी या कार्यक्रमाची भूमिका उपस्थित महिलांना सांगितली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिक्की महिला आघाडीच्या पुणे अध्यक्षा पिंकी राजपाल होत्या. या कार्यक्रमास पुणे शहर (Pune City) व जिल्हा व विभागातून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांना विविध क्षेत्रात उपयुक्त अशा महिला विशेषाधिकार कार्ड चे उद्घाटन करण्यात आले. Pune news

यावेळी पुणे उद्योग विभागाचे संचालक शैलेश रजपूत, फिक्की पुणेच्या अध्यक्षा पिंकी राजपाल, या कार्यक्रमाच्या समन्वयीका सुरभि प्रकाश दीक्षित, निमिषा ढाकरे यासह फिक्की महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख अधिकारी यांनी महिलांना उद्योग विषयक मार्गदर्शन केले. pune

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

---Advertisement---

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

IAF : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles