Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणपुणे : ट्रायफेड आणि शबरी च्या अधिकाऱ्यांकडून जुन्नर तालुक्यातील वनधन केंद्रांना भेट

पुणे : ट्रायफेड आणि शबरी च्या अधिकाऱ्यांकडून जुन्नर तालुक्यातील वनधन केंद्रांना भेट

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर : ट्रायफेड जनजाती कार्य मंत्रालय भारत सरकार  तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ जुन्नर यांच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील वनधन केंद्रांना भेट दिली. या भेटीमध्ये योजनेचा जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी फायदा घ्यावा म्हणुन प्रधानमंत्री वनधन योजने ची माहिती केंद्रांना देण्यात आली. 

यावेळी आंबोली, अंजनावळे, चावंड, आपटाळे, घाटघर या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष वनधन केंद्रांच्या कामाची पाहणी करण्यात आली. तसेच वनधन केंद्रांची खरेदी विक्री ची माहिती घेतली. ज्या केंद्रांना निधी प्राप्त झालेला आहे त्यांचं योग्य नियोजन करून केंद्रांनी त्याचा फायदा करुन घ्यावा आणि वनधन केंद्रातून जास्तीत-जास्त उत्पादने तयार करून त्याची विक्री करण्यासाठी ट्रायफेड ची मदत घ्यावी, असे आवहान ट्रायफेड चे प्रादेशिक व्यवस्थापक मयूर गुप्ता यांनी केंद्रातील सदस्यांना मार्गदर्शन करतेवेळी केले. 

या भेटीदरम्यान वन धन केंद्रातील सदस्यांच्या प्रश्नांचे निरसन ट्रायफेड चे व्यवसाय व्यवस्थापक गणेश धराडे यांनी केले. यावेळी ट्रायफेड चे अतुल पाटील, जानकीराम गवांदे, शबरी जुन्नर चे शाखा व्यवस्थापक महेश धावणे, रोहिणी मडके, मार्गदर्शक संस्थेचे प्रतिनिधी अरुण काठे, विश्वनाथ निगळे, नाथा शिंगाडे, प्रिया गोर्डे, वनधन केंद्रातील अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय