पुणे – निघोजे कुरणवाडी येथे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने देशी 75 झाडाचे वृक्षारोपण पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेष्ट महिला श्रीमती सगुणाबाई नाणेकर यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. (Pune)
शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, आपण फक्त पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केली पाहिजे असे नाही तर वर्षभर वृक्षारोपण केले पाहिजे संगोपन केले पाहिजे आणि मुलाप्रमाणे त्याला जपले पाहिजे आपल्या कुटुंबातील काही वेळ राखून ठेवावा तो पर्यावरणासाठी द्यावा त्यामुळे पर्यावरण वाढीसही चालना मिळेल.
गुणवंत कामगार संगिता जोगदंड म्हणाल्या कि,आपल्या एकमेकांना काही भेट वस्तू द्यायचे असेल तर इतर वस्तू ऐवजी झाडे द्यावीत यामुळे प्रेमाचे नाते म्हणून दिलेले झाड लावले जाईल आणि जगवले जाईल. (Pune)
तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा, सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे आपल्या स्वतःच्या पडीक गायरान जागेत आंबे, चिंच, जांभूळ, फणस फळ देणारी देशी झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे असे मत संस्थेचे खेड अध्यक्ष शंकर नाणेकर यांनी व्यक्त केले.
नाणेकर म्हणाले कि तुम्ही पर्यावरणाची धरा कास, तरच होईल आपला विकास.
यावेळी विनीत नाणेकर म्हणाले, कि उन्हाळ्यामध्ये सूर्य आग ओकतोय जागतिक तापमान वाढलेले आहे आणि याचा फटका आपणा सर्वांना मिळताना दिसत आहे म्हणून आपण प्रत्येक घरातील व्यक्तीच्या नावाने किंवा पुण्यस्मरणानिमित्त आपण झाडे लावले पाहिजे आणि ते जगवले पाहिजेअसे मत व्यक्त केले. (Pune )
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, खेडचे अध्यक्ष शंकर नाणेकर, विविध सोसायटीचे अध्यक्ष कैलास येळवंडे,गुणवंत कामगार संगिता जोगदंड, एचडीएफसीचे शाखा व्यवस्थापक सोपान नाणेकर, मा.सरपंच हिरामण येळवंडे, श्रीमती सगुनाबाई नाणेकर ,वर्षां नाणेकर, उद्योजक बाजीराव येळवंडे, उद्योजक शिवकुमार बायस, कामगार नेते नागेश दळवी, तुकाराम मराठे, सचिव मयूर येळवंडे, प्रकाश जामदार, नामदेव येळवंडे, संभाजी येळवंडे, गुणवंत कामगार काळुराम लांडगे, रावसाहेब धुळगंड, सर्वेश नाणेकर, अभिजित नाणेकर, अशोक येळवंडे, इत्यादीनी सक्रीय सहभाग नोंदवला.
---Advertisement---
---Advertisement---
Pune : जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वसंध्येला मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने वृक्षारोपण
---Advertisement---
- Advertisement -