Thursday, April 25, 2024
Homeजिल्हापुणे : राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली

पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली

पुणे, दि. १९ : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला गेला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं चित्रं पाहायला मिळालं. अजितदादा नेहमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मात्र तुफान गर्दी पाहायला मिळाली.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार यांनी येथील गर्दी विषयी माध्यमांंशी बोलताना त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे.

उद्घाटनाची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी – जगदीश मुळीक 

राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी असल्याची टिका, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांंनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी ही पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी आहे. जगताप भानावर आले असतील तर त्यांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मुळीक यांनी केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय