Sunday, March 16, 2025

Pune : सकल मातंग समाज अस्मिता ध्वज पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरात शेकडो ठिकाणी उभे करणार – युवराज दाखले.

पुणे – शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बोपोडी या ठिकाणी मातंग समाज अस्मिता ध्वज जेष्ठ नेते नाना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योजक अनिल गायकवाड यांच्या शुभहस्ते उभा करण्यात आला. (Pune)

दरम्यान शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात शेकडो ठिकाणी मातंग समाज अस्मिता ध्वज उभारण्याचा संकल्प शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांनी केला समाज बांधवांनी या मोहिमेत सहभागी आनंदाने सहभागी झाले होते. (Pune)

यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, कार्यालय मुख्य सचिव कल्पना मोरे (दाखले) खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे, पुणे शहर अध्यक्षा ललीता गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर,
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सनी गवई महासचिव सुरज आण्णा कांबळे, शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी शहराध्यक्ष अनिल तांबे, मुळशी तालुका अध्यक्ष तुकाराम शिरसागर,पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अनिकेत साळवे, सचिव राहुल सावंत,
रोहन माने, रोहन भिसे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles