Friday, April 19, 2024
Homeजिल्हापुणे : हातगाडी, टपरीधारकांचे पिंपरी चिंचवड महापालिकेवर जोरदार आंदोलन

पुणे : हातगाडी, टपरीधारकांचे पिंपरी चिंचवड महापालिकेवर जोरदार आंदोलन

एकतर्फी कारवाई थांबवून कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी

स्मार्ट सिटीत गरिबांनी जगायचं का नाही?  – काशिनाथ नखाते 

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पिंपरी-चिंचवड शहरातील आठ ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होत असुन त्यांचे साहित्य जप्त केले जात आहे महापालिका आयुक्त शहरांमध्ये येऊन सहा महिने झाले तरी अजुन एकही शहर फेरीवाला समितीची बैठक न घेता मनमानी पद्धतीने कारवाई करण्यात येत असून गरीब विक्रेत्यांचा रोजगार हिरावून घेऊन त्यांना बेरोजगार केले जात आहे याच्या निषेधार्थ नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर आज आंदोलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मोठ्या घोषणा देत शहरातील फेरीवाल्यांनी सहभाग नोंदवला “नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी”, “स्मार्ट सिटी नको रोजीरोटी द्या”, “सनासुदित  व्यवसाय हिरावू नका कायद्याची अमंलात आना “, या मागण्याचा फेरीवाल्यानीं आग्रह धरला.

यावेळी नखाते म्हणाले, देशाच्या संसदेने सन २०१४ मध्ये “पथ विक्रेता अधिनियम” हा कायदा केला आहे, राज्य शासनानेही महापालिकेला आदेश दिले आहेत. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्ताधारी मंडळी आणि आयुक्त हे गोरगरीब फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करून त्यांचा व्यवसाय हिरावून घेऊन त्यांना देशोधडीला लावण्यात येत आहे  कायद्याची अंमलबजावणी न करता शहरात विविध ठिकाणी येथे व्यवसाय करायचा नाही असे म्हणून त्यांना कारवाई करून त्यांना धमकावले जात आहे. 

हेही पहा ! गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्कार’ प्रदान !

बोगस हॉकर्स झोंन केले जात आहेत यामुळे फेरीवाला भयभीत झाला असून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचे महापालिकेकडून उल्लंघन होत आहे मुळातच कोरोना कालावधीमध्ये अत्यंत संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांचे व्यवसाय आता कुठेतरी सुरुवात झालेली असताना महापालिकेने धडक कारवाई मोहीम स्थापन करून अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररीत्या कारवाई केली जात आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्यांना चिरडण्याचा प्रयत्न होत आहेत शहराच्या विकासाला विरोध नाही. मात्र त्या विकासामध्ये फेरीवाल्यांचे स्थान असणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा हातगाडी, टपरीधारक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करतील, असेही नखाते म्हणाले.

यावेळी शहरातील विविध भागातून आलेल्या विक्रेत्यानी आपल्या समस्या मांडल्या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी व प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पुढील आठवड्यामध्ये आयुक्त यांचे बरोबर बैठकीचे आश्वासन दिले.

हेही वाचा ! जुन्नर : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान !

कामगार नेते तथा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, महिला विभागाच्या वृषाली पाटणे, वहिदा शेख, सुनंदा चिखले, शमा सय्यद, नंदा तेलगोटे, सुरेश देडे, किरण साडेकर, यासीन शेख, अमृत माने, काशीम तांबोळी, सखाराम केदार, तुकाराम माने,सलीम डांगे, संभाजी वाघमारे, सय्यद अली, राजू बोराडे, अमृत माने, इरफान मुल्ला, शारदा राक्षे, राजाभाऊ हाके, मनीषा ससाने, आत्मा गुप्ता, जयश्री कांबळे, नंदू आहेर, ओमप्रकाश मोरया, नितीन भराटे, आशा बनसोडे, सीमा गायकवाड, नंदू आहेर, प्रशांत गवई, सूरज देशमाने, सुधीर गुप्ता आदीसह शहरातील विक्रेते उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय