पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – संजीवनी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या मानव अधिकार संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर आण्णासाहेब थोरात यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” नुकताच जाहीर करण्यात आला.
शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ हा राज्यस्तरीय पुरस्कार किशोर थोरात यांना १५ मार्च २०२५ रोजी सिन्नर येथे संजीवनी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे. (Pune)
निस्वार्थपणे कर्म करत राहिल्यावर ईश्वरालाही आपल्याकडे लक्ष द्यावे लागते, म्हणूनच या समाजकार्याची निरंतर सेवा अशीच पुढे घडत राहील व पुन्हा पुन्हा या मान सन्मानासाठी पात्रता वाढत राहील अशा भावनेतून काम करून किशोर थोरात हे एक समाजात एक अनोखा ठसा उमठवत आहेत.
किशोर थोरात हे मागील दहा वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम करत असल्याने हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.किशोर थोरात हे विविध संस्था मार्फत आपले सामाजिक काम करत असतात जसे की, आधार शैक्षणिक संस्था,पुणे मार्फत गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत,
,सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेच्या मार्फत अन्याया विरुद्ध लढाई, स्वामी समर्थ सेवा प्रचिती या संस्थेच्या मार्फत हजारो स्वामी समर्थ सेवेकर्यांच्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न आणि
समर्थ सोशल फौंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या मार्फत मधुमेहमुक्त आणि नशामुक्त भारत अभियान मध्ये काम करून योगदान समाजासाठी देत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले किशोर अण्णासाहेब थोरात यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी या अगोदरही विविध सामाजिक संस्थांकडून समाजरत्न २०२१ ,आदर्श समाजरत्न प्रेरणा २०२२,आयकॉन ऑफ आशिया २०२२,प्राईड ऑफ नेशन २०२२,आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव २०२२, स्टार इंडियन लीडर शिप अवॉर्ड २०२४,लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२४,महाराष्ट्र आयकॉन २०२४ ,राष्ट्रीय गौरव रत्न पुरस्कार, भारत प्रतिभा सन्मान पुरस्कार,स्वामी विवेकानंद प्रेरणा सम्मान, राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
Pune
किशोर थोरात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की पुरस्कार हा माझ्या बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा सन्मान आहे व सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.त्यांनी मागील वर्षी पैसे नको,रद्दी द्या, हा अभिनव उपक्रम देहुगाव येथील वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे राबविला असून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेच्या मार्फत अनेक गोर गरीब ,गरजू लोकांचे अन्यायाचे,फसवणुकीचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करत असतात.
तर यापुढेही असेच विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम निश्चितच चालू ठेऊन देशाच्या हितासाठी एक खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे आणि पुरस्कार हे प्रेरणा देतात व त्याचे फळ नक्कीच सेवेतून मिळत असल्याचे किशोर थोरात यांनी सांगितले.
समाजकार्याची हाती घेतलेली ही धुरा एकट्याने ओढणे शक्य नाही म्हणूनच किशोर थोरात यांच्या बरोबर समाजकार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला हा सन्मान समर्पित करून त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.
हा अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल किशोर थोरात यांचे विविध स्थरातून कौतुक केले जात आहे.
---Advertisement---
---Advertisement---
Pune : किशोर थोरात यांना राज्यस्तरीय “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” जाहीर
---Advertisement---
- Advertisement -