पुणे कचरा वाचकांच्या मागण्यांसाठी पुणे महापालिकेवर आंदोलन (Pune)
पुणे : कचरा वाहक ,वेचक यांच्या विविध मागण्यासाठी पुणे महापालिकेला वेळोवेळी मागण्या करूनही दुर्लक्ष केल्यामुळे कचरा वाहक,वेचक संघटनेच्या वतीने आज पुणे महापालिका येथे आंदोलन करण्यात आले. (Pune)
यावेळी आठ दिवसाच्या आत पुणे महापालिकेने दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य एन झाल्यास खासदार व पुणे मागपालिका आयुक्त यांच्या गाड्या अडवण्यात येतील असा इशारा कचरा वाहक वेचक मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष विजयबापू डाकले यांनी दिला आहे.
यावेळी पुणे महापालिकेने येत्या आठ दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे.
कचरा वाहक वेचकांनी जमा केलेला कचरा पालिकेच्या संकलन केंद्रांवर घेणे तसेच इतर समस्या व अडचणीसाठी ,कचरा वाहक वेचक मागासवर्गीय सहकारी संस्था कचरा संकलन व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये पुणे शहराच्या विविध भागात कार्यरत असणारी प्रमुख संस्था आहे.
आमच्या संस्थेचे सभासद वेगवेगळ्या रहिवासी तसेच व्यावसायिक इमारतीमधील कचरा जमा करतात. जमा केलेल्या कचऱ्यामधून भंगार वेगळे करून त्यावर स्वतःची व कुटुंबीयाची उपजीविका चालवत आहेत. राहिलेल्या कचरा ते गेले अनेक वर्षापासून पालिकेच्या कचरा संकलन केंद्रावर जमा करत होते.
परंतु काही महिन्यापूर्वी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मनमानी पद्धतीने शेकडो कुटुंबियाचा विचार न करता एका अध्यादेशाद्वारे सदर कचरा हा संकलन केंद्रांवर जमा न करता पालिकेने निर्माण केलेल्या फिडर किंवा ठेकेदारांच्या गाड्यांमध्ये जमा करण्याचे जाहीर केले.
आमच्या संस्थेचे शहरभरातील सर्व सदस्य हे पालिकेने आखून दिलेल्या ओला व सुका कचरा वेगवेगळा करून दिला जावा या नियमानुसार काम करत आहेत.
परंतु घरोघर जाऊन कचरा जमा करणे तो स्वतःच्या टेंपो मध्ये भरणे परत तो पालिकेच्या कॉम्पॅक्टर वाहनात खाली करणे खाली करताना सांडलेल्या कचरा पुन्हा भरणे असे एकच काम तीन-तीन वेळा करावे लागते.
तसेच ठेकेदारांच्या कॉम्पॅक्टर गाड्या न येणे, कचरा जमा करण्यासाठी दिवस दिवसभर कचरा जमा करण्यासाठी थांबून राहणे अशा घटना रोजच घडत आहेत. याबाबतीत गेले आठ महिन्यापासून आम्ही महापालिका आयुक्त, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन व विविध क्षेत्रीय कार्यालयातील उपायुक्त यांना निवेदन दिली आहेत. (Pune)
यावेळी अध्यक्ष विजय डाकले, नामदेव पुलावळे, अमोल जाधव, हनुमंत गायकवाड, मोहन भिसे, बसवराज कळकेट्टी, विजय बगाडे, धनाजी भिसे यासह पुणे शहरातील महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.