पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोमाळे गावात आदिवासींचा रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न झाला. शनिवार दि.९ ऑक्टोबर २०२१ रोजी खालचे भोमाळे ता.खेड जि. पुणे येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामस्थांनी ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून आदिवासींची भलरी सादर करीत करण्यात आली.
आदिवासींना रानभाज्यांची चांगली माहिती असून त्याचा फायदा सर्वांना होण्यासाठी व जंगलातील भाज्यांचे जतन, संवर्धन व पुनर्निर्मिती करणे आयुर्वेदिक महत्व सांगणे, या उद्देशाने ग्रामपंचायत भोमाळे, ग्रामस्थ, महिला बचत गट, आणि कल्पवृक्ष संस्था, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवास आदिवासी महिलांनी तांदळाची, नाचणीची, बाजरीची भाकरी, तसेच रान भाज्यांमध्ये चिचर्डी, भोकर,चईताची, फणसाची, कसुराची लुतीची, आवळ, गोठवेल,
पाथरी, रानकेळ, लाल माठ, भारंगी, पाथवड, दुधी, सर वाळा, तेऱ्या, शेवगा, कोकम, अंबाडी, कुरडू, गोहवेल, तोंड्या ,कोंभळ, टाकळी, कांडे, चित्रूक, बरकी, कौला, पराडी, तेरडा, कोंबडा, भोकर यासह अन्य ४४ प्रकारच्या भाज्या तसेच तिळाची, मिरचीचा ठेचा, आळुच्या वड्या, रताळ्याच्या वड्या, यासह अन्य खाद्यपदार्थ खवय्यांसाठी बनवून ठेवले होते. आणि त्याचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
या कार्यक्रमासाठी कल्पवृक्ष संस्थेचे सुभाष डोळस, प्रदीप चव्हाण, डॉ.संतोष सुपे, महेश देशपांडे, पूर्वा कुलकर्णी, तसेच सरपंच सुधीर भोमाळे, उपसरपंच नयना शिंदे, शिवाजी वाळुंज, सभापती विठ्ठल वनघरे, रामदास माठे, दत्ता वनघरे, एँड. अरुण मुळूक, खंडू काठे तसेच विविध भागातून पर्यटक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन नयना शिंदे, सुरेखा केदारी, नवनाथ शिंदे, प्रियंका शिंदे, मंगल भोमाळे, नंदा काठे, पार्वती वन घरे यांनी केले.