Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : राष्ट्र‌वादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्षपदी पुनम विधाते

Pune : राष्ट्र‌वादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्षपदी पुनम विधाते

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्षपदी पुनम विशाल विधाते यांची निवड करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूनम विधाते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. (Pune)

पूनम विधाते ह्या गेली अनेक वर्ष राजकारणासह सामाजिक कार्यात सक्रिय कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत, राष्ट्र‌वादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडीनंतर पुनम विधाते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, महिला शहराध्यक्ष प्रिया गदादे यांचे आभार मानले. (Pune)

नवी जबाबदारी मिळाल्यानंतर पूनम विधाते म्हणाल्या की, नव्या जबाबदारीसह नवीनं आव्हाने स्वीकारताना जास्तीत जास्त महिलांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय