पुणे – स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधात स्त्री मुक्ती लीग संघटनेतर्फे 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता स्वारगेट स्थानक येथे लाक्षणिक निदर्शने आयोजित करण्यात आली. (Pune)
यावेळी स्त्री मुकी लिगच्या समन्वयक स्वप्नजा लिमकर, कार्यकर्त्या अश्विनी खैरनार, टी. ललिता, अभिजित अ.मी. दिशा विद्यार्थी संघटनेचे मिराज तसेच अनेक युवक, युवती, सामान्य जन, कामगार-कष्टकरी उपस्थित होते.
बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, आणि महिलांची असुरक्षितता वाढत आहे. (NCRB) आकडेवारी सांगते की एकट्या 2022 मध्ये 4,45,256 स्त्री विरोधी गुन्ह्यांची नोंद झाली, म्हणजे दर तासाला सरासरी 51 एफआयआर(FIR) झाले! त्यात, दर दिवशी 86 महिला-विरोधी बलात्कारांच्या घटना नोंदवल्या जातात.
आरजी कर, बदलापुर सारख्या घटना नुकत्याच झाल्या आहेत. शाळा, कॉलेज, रस्ते, गार्डन, टेकड्या, हॉस्पिटल्स, बस स्थानकेच नाही, तर घरांमध्ये सुद्धा महिलांवर बलात्कार, अत्याचार होत आहेत.
याला जबाबदार आहे ती सर्वप्रथम समाजात व्याप्त पुरुषप्रधान मानसिकता जी महिलांना उपभोग्य वस्तू मानते, चूल आणि मूलाचे साधन मानते, पुरुषांचा स्त्रीवर अधिकार मानते, तिला अबला मानते, आणि स्त्रीच्या तथाकथित योनिशुचितेला पावित्र्याचे आवरण देते, जिच्याविरोधात व्यापक प्रबोधनाची आणि संघर्षाची आवश्यकता आहे.
समाजात सतत चंगळवाद, उपभोगवाद पसरवत स्त्री-पुरुष देहाचे बाजारीकरण करणारा नफेखोर “मनोरंजन” बाजार आणि प्रसारमाध्यमे. स्त्रीला शिक्षण, रोजगाराच्या संधीसोबत स्वातंत्र्य आणि सन्मान नाकारणारी नफेखोर भांडवली अर्थव्यवस्था. यासोबतच गुन्हेगाराना मिळत असलेले सत्तेचे समर्थन आणि राजकीय पक्षाच्या नेत्याकडून केले जाणारे निर्लज्ज समर्थन सुद्धा गुन्हेगाराना चालना देत आहे. (Pune)
कुलदीप सिंह सेंगर, बृजभूषण सिह सारख्याना भाजपचे समर्थन, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्याचे सत्कार, कठुआ बलत्काऱ्याच्या समर्थनात तिरंगा रॅली याची काही उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात बीड-परभणी सारख्या घटनामध्ये मुख्यमंत्र्याकडूनच होणारा मंत्र्याचा बचाव सुद्धा गुन्हेगाराना निर्ढावणारा आहे.
त्यामुळे आम्ही मागणी करत आहोत की, गुन्हेगारांवर त्वरीत आणि कडक कायदेशीर पद्धतीने कारवाई व्हावी, आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा; तसेच स्वारगेट बस स्थानक व पोलीस यातील जबाबदार कर्मचाऱ्यांवर पण कारवाई व्हावी. अशा मागण्या स्त्री मुक्ती लीगने केल्या आहेत. याबाबत स्वप्नजा लिमकर समन्वयक स्त्री मुक्ती लीग यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

हे ही वाचा :
इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ
संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!