Saturday, October 5, 2024
Homeजिल्हापुणे जिल्ह्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या संशयित ड्रोनमुळे नागरिकांमध्ये दहशत

पुणे जिल्ह्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या संशयित ड्रोनमुळे नागरिकांमध्ये दहशत

Pune: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास आकाशात फिरणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्यरात्री तीन ते चार ड्रोन एकाच वेळी आकाशात उडत असल्याने स्थानिकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या ड्रोनवर लाल आणि हिरव्या रंगाच्या दिव्यांचे झगमगाट असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.

पुण्याजवळील हिंजवडी आयटी पार्कपासून भूगाव आणि पौडपर्यंतच्या भागात हे ड्रोन नियमितपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात अशाच प्रकारचे ड्रोन दिसले होते, ज्यापैकी एक दोन ड्रोन घरावर कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. या घटना काही काळ थांबल्या होत्या, मात्र आता पुन्हा मोठ्या प्रमाणात ड्रोन दिसू लागले आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

दररोज किमान १० ते १२ ड्रोन मुळशी परिसरात दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या ड्रोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष यंत्रणा खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याचे काही अपडेट मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत, जसे की या ड्रोनद्वारे रेकी केली जात आहे का? किंवा घरांवर दरोडा टाकण्याचा काही कट तर रचला जात नाही ना?

या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी गावात रात्रीच्या वेळी पहारा देण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी मात्र नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या गावागावात ड्रोन फिरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे या घटनेबाबत अधिक चर्चा होत आहे.

सातारा, बीड, अहमदनगर, जालना अशा विविध जिल्ह्यांतही काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचे ड्रोन दिसल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या घटनांमुळे नागरिकांत अधिक सतर्कता बाळगली जात आहे.

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

संबंधित लेख

लोकप्रिय