---Advertisement---
जुन्नर, दि. २७ : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात भात लागवडीला सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी भात लागवडीला वेग आला आहे.
---Advertisement---
मागील काही दिवसांत पावसाने पाठ फिरवली होती. परंतु पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील घाटघर, तळेचीवाडी, अंजनावळे, देवळे, फांगुळगव्हाण या भागात भात लागवडीला सुरुवात झाली आहे. गाणे म्हणत महिला भात लावताना पहायला मिळत आहेत.