Friday, April 19, 2024
Homeजिल्हापुणे महानगरपालिका कनिष्ठ लिपिक, टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर !

पुणे महानगरपालिका कनिष्ठ लिपिक, टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर !

पुणे : पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध ४०० हुन जास्त पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यात येत आहेत. IBPS संस्था यासाठी परीक्षा घेत आहे. महापालिका प्रशासनाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कनिष्ठ लिपिक, टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा अंतिम करण्यात आल्या आहेत. लिपिक, टंकलेखक पदाच्या परीक्षा या १०, ११, १२ आणि १३ ऑक्टोबरला होणार आहेत. अशी माहिती महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. या पदासाठी जास्त उमेदवार असल्याने ३ दिवस परीक्षा चालणार आहे.

महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक कनिष्ठ अभियंते, विधी अधिकारी, अतिक्रमण निरीक्षक आणि लिपिक आदी पदांसाठी भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या भरतीसाठी १० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. शेवटच्या दिवसापर्यंत विविध पदांसाठी ८७ हजार ४७१ अर्ज प्राप्त झाले.

परीक्षा देण्यासाठी उमेदवारास एसएमएस आणि ई-मेलद्वारे युजर आयडी आणि पासवर्ड पाठविला जाणार आहे. तो युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतरच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मेरिटमध्ये येणार्‍या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून त्यांची थेट नियुक्ती केली जाणार आहे. या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाने सूचित केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय