Saturday, March 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे : मृदुला मेहेर शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात २२ वी

---Advertisement---

---Advertisement---

जुन्नर / आनंद कांबळे : नारायणगाव येथील श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कुलची विद्यार्थिनी कुमारी मृदुला मंगेश मेहेर हिने इयत्ता 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 22 वा क्रमांक मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशाबद्दल जुन्नर तालक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या वतीने तिचा व पालकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.

मृदुलाने यापूर्वी इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा आदि स्पर्धात्मक परीक्षेत देखील दैदिप्यमान यश संपादन केले असून शाळेत इयत्ता पहिलीपासून आजपर्यंत सतत प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. तिला भविष्यात वैद्यकिय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे मृदुलाने सांगितले.

हेही वाचा ! पुणे : जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन

हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles