Pune : सि. सं. नंबर 17, फायनल प्लॉट नंबर 246, बंड गार्डन रोड पुणे, या सरकारी जमिनीचे गैरव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी तसेच अनेक वर्षे या जागेवर राहत असलेले व व्यवसाय करीत असलेल्या नागरिकांना बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाया करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ व बाधितांचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्यासाठी मोबोज कंपाउंड रहिवाशी व व्यावसायिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंध विभाग कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात आला.
सि. सं. नंबर 17, फायनल प्लॉट नंबर 246, बंडगार्डन रोड पुणे या सरकारी मिळकतीमध्ये रहिवासी लोक सत्तर वर्षे पेक्षा अधिक व व्यावसायिक 40 वर्षापासून वास्तव्यास असून या सर्व लोकांना पुणे शहर तहसीलदार व या सरकारी जमिनीच्या भूखंडाचा गैर व्यवहार करणारी व इतर इसमानी न्यायालयाची व शासनाची कोणती परवानगी नसताना भ्रष्ट मार्गाने खरेदी-विक्रीचे दस्त सरकारी सर दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदवले आहेत. (Pune)
ही बाब आम्ही लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी व पुणे शहर तहसीलदार यांना वारंवार सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून आम्हा व्यावसायिक यांना दिनांक 11/7/2024 रोजी अतिक्रमण कारवाई करून उध्वस्त केले आहे. तसेच रहिवाशी लोकांना पुणे शहर तहसीलदार येथे येऊन सांगतात की लवकरात लवकर घरे खाली करा नाहीतर तुम्हाला पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणाहून हाकलून देऊ. आमची असणारी न्यायिक मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे कोणते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आमचा कोणत्याही प्रकारे पुनर्वसनाचा विचार करत नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सदर सरकारी जागेच्या बेकायदेशीर व्यवहाराची सखोल चौकशी करावी व झालेले आर्थिक गैरव्यवहार तसेच सरकारी जागेवर केलेले बेकायदेशीर गुंतागुंतीचे व्यवहार रद्द करण्यात यावे. तसेच शासकीय अधिकाराचा गैरवापर केल्याने पुणे शहर तहसीलदार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी समिती नेमावी हे प्रकरण अतिशय गंभीर बाब असून मोबोज हॉटेल कंपाउंड मधील रहिवासी व व्यावसायिक यांचे या जागेमध्ये पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी आंदोलनाचे समन्वयक शैलेंद्र मोरे यांनी केली. (Pune)
या आंदोलनात, संयोजक शैलेंद्र मोरे, मिलिंद अहिरे, श्रीनाथ कांबळे, दीपक गायकवाड, बंडू पाटील यासह पुणे शह्रारातील विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
(Pune)
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा