Monday, September 16, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : बार्टीच्या विद्यार्थ्यांचा फिलोशिपचा प्रश्न मार्गी लावणार - आमदार अमित गोरखे

Pune : बार्टीच्या विद्यार्थ्यांचा फिलोशिपचा प्रश्न मार्गी लावणार – आमदार अमित गोरखे

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : बार्टी कार्यालय, पुणे येथे आंदोलक विद्यार्थ्यांची आमदार अमित गोरखे यांनी भेट घेतली. गेल्या अडीच वर्षापासून संशोधक विद्यार्थी फिलोशिप साठी विविध प्रकारे आंदोलन करीत आहेत. शासनाने पन्नास टक्के फिलोशिप देण्याचा निर्णय जाहीर केला, परंतु तो निर्णय मान्य नसल्याने विद्यार्थी आंदोलनास बसले आहेत. (Pune)

या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावणार असून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.
नुकताच शासनाने सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) नियमाच्या अर्धी (पन्नास टक्के ) शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय मान्य नसल्याने काही दिवसापासून बार्टी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्या अनुषंगाने त्यांची आमदार अमित गोरखे यांनी भेट . (Pune)

आमदार अमित गोरखे यांनी बार्टीचे महाव्यवस्थापक सुनील वारे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली.

यावेळी राहुल डांबाळे, विशाल गवळी, संजय सोनवणे, यशवंत नडघम, स्वप्नील नरबाग, अक्षय जाधव, उपोषणकर्ते हर्षवर्धन दवणे, पल्लवी गायकवाड, अक्षय जाधव, भीमराव वाघमारे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम, पोलीस निरीक्षक मृणाल मुल्ला उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय