बारामती :- बारामती एमआयडीसी येथील औद्योगिक परिसरातील आय एस एम टी कंपनी मध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष किशोर भापकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष कल्याण कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. तसेच संघटनेचे जनरल सेक्रेटरी गुरुदेव सरोदे यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यापुढील आव्हाने या विषयी माहिती सांगितली. कंपनीचे प्लांट हेड किशोर भापकर यांनी कंपनीच्या कार्याचा आढावा घेतला ,तसेच भविष्यात कामगार व अधिकारी यांनी कंपनीच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन केले.
ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !
याप्रसंगी कंपनीतील बेस्ट अटेंडन्स अवॉर्ड 10 कामगार बंधूंना प्रदान करण्यात आले. त्यापैकी दत्तात्रय बारवकर हे गेली 18 वर्षांपासून रजेची सुट्टी न घेता सतत कंपनीच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत, त्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाने त्यांचा विशेष सन्मान केला.
बँक ऑफ बडोदा येथे 220 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा!
२०२२ पद्म पुरस्कारांची घोषणा, असे आहेत पुरस्काराचे मानकरी
याप्रसंगी कंपनीतील सर्व विभागप्रमुख ,युनियन प्रतिनिधी, सोसायटी प्रतिनिधी, अधिकारी व बहुसंख्य कामगार बंधू उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल माळवे यांनी केले.