Tuesday, April 16, 2024
Homeजिल्हापुणे : लोकल क्राईम ब्रँच ची दमदार कारवाई गावठी पिस्तूलासह दोन काडतुसे...

पुणे : लोकल क्राईम ब्रँच ची दमदार कारवाई गावठी पिस्तूलासह दोन काडतुसे जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

पुणे / रवींद्र कोल्हे :  वडगाव मावळ शिवारात लोकल क्राईम ब्रँच अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस गस्त घालीत असतांना सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे गस्त आणि त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदरामार्फत बातमी मिळाली की, पुणे मुंबई हायवेवर माळी नगर कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दोन जण संशयित रित्या फिरत आहेत.

या माहितीच्या आधारे त्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता,त्यांनी त्यांचे नांवे मदन तुळशीराम वारंगे (वय ३१ वर्ष, रा.माळी नगर, वडगांव मावळ, जिल्हा पुणे) व सागर दिलीप भिलारे ( रा.भिलारे वाडी, वडगांव मावळ ) अशी त्यांनी नावे सांगितली.

मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता, या दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासात पोलिसांचा संशय बळावला त्यांनी दोन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता, मदन तुळशीराम वारंगे याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल आणि दोन काडतुसे व इतर माल असा एकूण ८१ हजाराचा मुद्देमाल मिळून आला. मदन वारंगे याच्यावर वडगांव मावळ पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांची वैद्यकीय तपासणी केली करून पुढील कार्यवाहीसाठी वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पो.ह.दीपक साबळे, विक्रम तापकीर, मुकुंद आयाचित, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, प्रसन्न घाडगे, प्राण येवले, सहायक फौजदार मुकुंद कदम व पोलिस मित्र प्रसाद पिंगळे यांनी यशस्वीरीत्या कारवाई केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय