पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व जागतिक लिगायत महासभा पुणे, राष्ट्रीय लिगायत महामंच भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 02 मार्च 2025 रोजी रविवारी सकाळी ११ ते 3 वेदशास्त्रोतेजक सभा सदाशिव पेठ, हॉटेल कल्पना समोर, पुणे येथे राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे यांनी माहिती दिली. (Pune)
लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राजेंद्र आलमखाने – महात्मा बसवेश्वर नाटमनिर्माते, लिंगायत परिषद पुणे अध्यक्ष नंदिनी पाटील – जेष्ट पत्रकार पुणे, जागतिक लिंगायत महासभा स्टेट जनरल सेक्रेटरी- बसवराज कणजे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे चंदकांत हुरकुडे – जागतिक लिगायत महासभा, स्टेट सेक्रटरी सतिश कुमदाळे – जागतिक लिगायत महासभा जिल्हा अध्यक्ष पुणे, संगमेश्वर सरकाळे – जागतिक लिगायत महासभा जिल्हा उपाध्यक्ष, सरला चिमगावे – महिला आघाडी पुणे, स्वप्निल खडके – उपाध्यक्ष – कै भिकुबाई मेनकुदळे लिगायत पंचम ट्रस्ट पुणे, ॲड. निळकंठ पाटील – शरण साहित्य अभ्यासक, प्रा राजाराम पाटील – धर्मप्रसारक, नामदेव कोरे – अध्यक्ष – जागतिक लिंगायत महासभा सांगली, तुकाराम माळी – उपाध्यक्ष – जागतिक लिगायत महासभा सांगली, सिद्धरामेश नावदगेरे – अध्यक्ष बसववादी सोशल फौडेशन, संतोष मल्लशेटी – बसवसेवा प्रतिष्ठान पुणे, चंदकांत खोचरे – जागतिक लिगायत महासभा पुणे मेबर आदी उपस्थित राहणार आहेत. (Pune)
महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली या संस्थेच्या वतीने सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, गुडापूर, या ठिकाणी मेळावा घेण्यात आला असून व पुढील मेळावे बेळगाव, विजापूर, अथणी या ठिकाणी नियोजित असल्याने याचा फायदा सोलापूर मेळाव्यातील वधुवरांना होणार आहे.
सामाजिक बांधलिकीतून उपक्रम घेवून सुयोग्य जोडीदार मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेळावा आयोजित करण्यात येत असल्याने यांचा फायदा पुणे मेळाव्या मध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त बांधवाना होतो.
पुणे या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामध्ये नोंद करुन सहभागी होणाऱ्या वधुवरांना संस्थेच्या वतीने 2024 मध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेले मेळाव्याचे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे व सांगली सोलापुर, पुणे 2024 मध्ये झालेल्या मेळाव्याचे व सोलापूर, पुणे येथे होणाऱ्या मेळाव्याचे एकत्र पुस्तक प्रकाशित करून वधुवरांना पाठविण्यात येणार आहे. तरी यांची नोंद घेऊन जास्तीत जास्त समाज बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन आप्पासाहेब शेगावे यांनी केले आहे.