पुणे – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नासिक यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार २०२५” हा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या मानव अधिकार संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर आण्णासाहेब थोरात यांना नासिक येथे प्रदान करण्यात आला. (Pune)
‘संविधानाने प्रत्येक नागरिकाला जसा अधिकार दिला त्याप्रमाणे जबाबदाऱ्या देखील दिल्या आहेत. त्यामुळे देश सध्या ज्या परिस्थितून जात आहे त्या परिस्थितीत प्रत्येक जबादार नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून देशा सोबत उभे राहायला हवे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार आणि न्यूज १८ लोकमत राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे संपादक मंदार फणसे यांनी केले. ते नाशिक मध्ये आयोजीत कोहीलुर राष्ट्रीय पुरस्कार समारंभात बोलत होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संधाच्या वतीने नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा कोहीपुर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आले. (Pune)
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे, न्युज १८ लोकमत न्युज चॅनलचे संपादक मंदार फलसे, मिसेस युनिव्हर्स व मिसेस दुबई ज्योती शिंदे ,लोकप्रिय अभिनेते पवन चौरे, लोकप्रिय अभिनेत्री मेहक, नॅशनल मोटीव्हेशनल स्पीकर डॉ. ततित बलदानिया (सुरत), वकीलनामा यूट्यूब चॅनलचे संपादक ऍड. अद्वैत बव्हान, मंत्राज ग्रीन रिसॉसचे पर्यावरणविद डॉ. यू. के. शर्मा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे मापून उपस्थित होते.
कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार २०२५ साठी माझी निवड केल्याने माझी समाजसेवेची जबाबदारी अजून वाढलेली आहे व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ महेंद्र देशपांडे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असे किशोर थोरात यांनी सांगितले.
गेल्या १३ एप्रिल रोजी त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संजीवनी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दिला जाणारा “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर २७ एप्रिल रोजी कलाजीवन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय रत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले होते.
पुरस्कार हे सातत्याने करत असलेल्या सामाजिक,शैक्षणिक, अध्यात्मिक व आरोग्य या क्षेत्रातील कामाची पोहोच असून त्यांच्या बरोबर या वरील क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तसेच सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ,नागपूर, आधार शैक्षणिक संस्था पुणे, अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट,पुणे आणि समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थांना ते अर्पण करतात. (Pune)
तसेच हे सर्व करत असताना त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या कुटुंबाला ते याचे सर्व श्रेय देतात कारण यासाठी त्यांना सातत्य ठेवावे लागले तरी त्यांच्या कुटुंबाला त्याग करावा लागतो.
पुरस्कार मिळणे हे जरी पुन्हा पुन्हा असेल तरी ते मिळण्यासाठी लागते समर्पण,सातत्य,जिद्द व गर्वाचा त्याग.एवढे जमले की समाजसेवा करणे एकदम सोपी होते आणि पुरस्कार आपल्यापर्यंत पोहोचतात असे किशोर थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
किशोर थोरात हे मागील १५ वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम करत असल्याने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.किशोर थोरात हे विविध संस्था मार्फत आपले सामाजिक काम करत असतात जसे की, आधार शैक्षणिक संस्था,पुणे मार्फत गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेच्या मार्फत अन्याया विरुद्ध लढाई, अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट या संस्थेच्या मार्फत हजारो स्वामी समर्थ सेवेकर्यांच्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न आणि
समर्थ सोशल फौंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या मार्फत मधुमेहमुक्त आणि नशामुक्त भारत अभियान मध्ये काम करून मोलाचे योगदान समाजासाठी देत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील उक्कलगाव (श्रीरामपूर) येथील रहिवासी असलेले किशोर अण्णासाहेब थोरात यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी या अगोदरही विविध सामाजिक संस्थांकडून २० पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले।आहे.
किशोर थोरात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की पुरस्कार हा माझ्या बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा सन्मान आहे व सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.त्यांनी मागील वर्षी “पैसे नको,रद्दी द्या” हा अभिनव उपक्रम देहुगाव येथील वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे राबविला असून आताही हा उपक्रम सातत्याने चालू आहे व सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेच्या मार्फत अनेक गोर गरीब, गरजू लोकांचे अन्यायाचे,फसवणुकीचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करत असतात.
तर यापुढेही असेच विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम निश्चितच चालू ठेऊन देशाच्या हितासाठी एक खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे आणि पुरस्कार हे प्रेरणा देतात व त्याचे फळ नक्कीच सेवेतून मिळत असल्याचे किशोर थोरात यांनी सांगितले.
समाजकार्याची हाती घेतलेली ही धुरा एकट्याने ओढणे शक्य नाही म्हणूनच किशोर थोरात यांच्या बरोबर समाजकार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला हा सन्मान समर्पित करून त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.
सदर पुरस्कार मिळाल्याने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे,राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी किशोर थोरात यांचे अभिनंदन केले.
अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ट्रस्ट चे अध्यात्मिक गुरू संजय तळोले व संस्थेमधील सर्वांनीच किशोर थोरात यांनी शुभेच्छा दिल्या. हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल किशोर थोरात यांचे विविध स्थरातून कौतुक केले जात आहे.
---Advertisement---
---Advertisement---
Pune : किशोर थोरात यांचा कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार २०२५ ने सामाजिक कार्यासाठी नासिक येथे सन्मान
---Advertisement---
- Advertisement -