पुणे – संजीवनी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत महत्त्वपूर्ण असा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ हा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या मानव अधिकार संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर आण्णासाहेब थोरात यांना सिन्नर येथे दिनांक १३ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (Pune)
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त विकास नवाळे, छावा संघटनेचे संस्थापक करण गायकर, कामगार नेते तथा मुंबई मित्र वृत्तपत्र समूह संपादक अभिजित राणे, राज्य महिला आयोग सदस्य उत्कर्षा रुपवते, सिन्नर येथील युवा नेते उदय सांगळे आदी उपस्थित होते. (Pune)
संजीवनी फौंडेशनचे चालू असलेल्या कामाची माहिती संस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर सानप यांनी दिली.
शिवछत्रपती या नावातच सर्व काही आहे आणि छत्रपतींच्या नावाने पुरस्कार मिळणे म्हणजे मी माझे भाग्य समजतो व या पुरस्काराने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळणार असून माझी समाजसेवेची जबाबदारी अजून वाढलेली आहे.
हा पुरस्कार मी सातत्याने करत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक व आरोग्य या क्षेत्रात कामाची पोहोच असून मी माझ्या बरोबर या वरील क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तसेच सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, नागपूर, आधार शैक्षणिक संस्था पुणे, अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट, पुणे आणि समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थांना अर्पण करतो.
तसेच हे सर्व करत असताना माझ्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या माझ्या कुटुंबाला मी याचे सर्व श्रेय देतो कारण यासाठी मला जरी कष्ट करावे लागले तरी माझ्या कुटुंबाला त्याग करावा लागतो.
पुरस्कार मिळणे हे जरी पुन्हा पुन्हा असेल तरी ते मिळण्यासाठी लागते समर्पण,सातत्य,जिद्द आणि गर्वाचा त्याग, एवढे जमले की समाजसेवा करणे एकदम सोपी होते आणि पुरस्कार आपल्यापर्यंत पोहोचतात असे किशोर थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
किशोर थोरात हे मागील १५ वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम करत असल्याने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. किशोर थोरात हे विविध संस्था मार्फत आपले सामाजिक काम करत असतात जसे की, आधार शैक्षणिक संस्था,पुणे मार्फत गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेच्या मार्फत अन्याया विरुद्ध लढाई, अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट या संस्थेच्या मार्फत हजारो स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न आणि
समर्थ सोशल फौंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या मार्फत मधुमेहमुक्त आणि नशामुक्त भारत अभियान मध्ये काम करून मोलाचे योगदान समाजासाठी देत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले किशोर अण्णासाहेब थोरात यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी या अगोदरही विविध सामाजिक संस्थांकडून गौरविण्यात आले आहे जसे की
समाजरत्न २०२१, आदर्श समाजरत्न प्रेरणा २०२२, आयकॉन ऑफ आशिया २०२२, प्राईड ऑफ नेशन २०२२, आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव २०२२, स्टार इंडियन लीडर शिप अवॉर्ड २०२४, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२४, महाराष्ट्र आयकॉन २०२४, राष्ट्रीय गौरव रत्न पुरस्कार, भारत प्रतिभा सन्मान पुरस्कार, स्वामी विवेकानंद प्रेरणा सम्मान, राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
किशोर थोरात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की पुरस्कार हा माझ्या बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा सन्मान आहे व सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.त्यांनी मागील वर्षी पैसे नको,रद्दी द्या, हा अभिनव उपक्रम देहुगाव येथील वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे राबविला असून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेच्या मार्फत अनेक गोर गरीब ,गरजू लोकांचे अन्यायाचे,फसवणुकीचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करत असतात. (Pune)
तर यापुढेही असेच विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम निश्चितच चालू ठेऊन देशाच्या हितासाठी एक खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे आणि पुरस्कार हे प्रेरणा देतात व त्याचे फळ नक्कीच सेवेतून मिळत असल्याचे किशोर थोरात यांनी सांगितले.
समाजकार्याची हाती घेतलेली ही धुरा एकट्याने ओढणे शक्य नाही म्हणूनच किशोर थोरात यांच्या बरोबर समाजकार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला हा सन्मान समर्पित करून त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.
हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल किशोर थोरात यांचे विविध स्थरातून कौतुक केले जात आहे.
---Advertisement---
---Advertisement---
Pune : किशोर थोरात यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ प्रदान
---Advertisement---
- Advertisement -