Wednesday, February 5, 2025

पुणे : उद्याच्या महाराष्ट्र बंद ला किसान सभेचा जाहीर पाठिंबा !

पुणे : उद्या ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला अखिल भारतीय किसान सभा, पुणे जिल्हा समितीने जाहीर दिला आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. या घटनेबद्दल सबंध देशभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

उद्या, बंदच्या दिवशी आपले गाव, शहर, तालुका व जिल्हा कडकडीत बंद राहील यासाठी सर्वांनी स्वयंप्रेरणेने सक्रियपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन किसान सभेचे ऍड.नाथा शिंगाडे, प्रा.अजित अभ्यंकर, डॉ.अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, राजू घोडे, लक्ष्मण जोशी, अमोद गरुड, दत्तात्रय बर्डे यांनी केले आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles