पुणे : राज्यात कोरोनाची तिसरी लाट वेशीवर येऊन ठेपली असताना राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात येत आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सवावर निर्बंध घातले जात आहे. आषाढी वारीसाठीही राज्य सरकारने नियमावली जारी करत पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली असली तरी मोजक्याच मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. अशातच वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नरजकैद केले आहे.
पालखी सोहळ्यात वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते.
आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथं पोहचले. त्यावेळी बंडातात्या कराडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.